ज्येष्ठांच्या हालचाली ‘लॉक’; असह्य वेदना, जखडलेल्या शरीरासाठी हा आहे रामबान उपाय

senior citizen.jpg
senior citizen.jpg

वाशीम : कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी घरात बसून राहणे हाच एकमेव सोपा उपाय आहे. मात्र, सतत घरात बसून राहिल्याने कुटुंबातील ज्येष्ठांचे संपूर्ण शरीरच जखडून जात आहे. जणू त्यांच्या हालचालीच ‘लॉक’ झाल्या आहेत. परिणामी, शरीराला आवश्यक हालचाल होत नसल्याने पाठ, कंबर, गुडघे, मणक्यांच्या आजारांमुळे असह्य वेदना सोसाव्या लागत आहेत. ही बाब पाहता ज्येष्ठांनी योग, आसन, प्राणायामांना थोडासा वेळ दिल्यास असह्य वेदनांचा त्रास कमी होण्यास हातभार लागू शकतो.

ज्येष्ठांकडे विशेष लक्ष देण्याची गरज का?
कोरोनामुळे कुटुंबातील लहान मुले, ज्येष्ठांचे आरोग्य जपणे फार गरजेचे आहे. कारण, लहान मुले व ज्येष्ठांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. परिणामी, ते लवकर आजारी पडू शकतात. ही बाब पाहता लहान मुले व ज्येष्ठांचे आरोग्य जपणे फार गरजेचे आहे.

सुक्ष्म व्यायामही फार गरजेचा
घरात बसून राहिल्यामुळे अंग जखडून जाते. त्यामुळे हाताची बोटे, मनगटे, गुडघे, कंबर, मान, पायाचा खालील भाग, हाताच्या भूजा, एकंदरीतच ज्या ठिकाणी सांध्यांचे जोड येतात. त्या प्रत्येक घटकासाठी थोडा सुक्ष्म व्यायाम केल्यास सांध्यांना मोकळीक मिळते.

झेपेल तेवढाच व्यायाम करा
उतारवयात शरीराच्या हालचाली मंदावतात. त्यामुळे ज्येष्ठांनी आपल्याला झेपतील तेवढ्याच सोप्या पद्धतीने शारीरिक हालचाली कराव्यात. त्यामुळे शरीरास फायदा होईल. नसता, खाली पडून इजा होणे, स्नायू, हाडे दुखण्याचा देखील त्रास होऊ शकतो.

ज्येष्ठांनी कशा प्रकारची आसने करावी?
ज्येष्ठांनी मुख्यत्वे हालकी आसने करावीत. ज्यामध्ये बैठी, जमिनीवर झोपलेल्या आसनांना प्राधान्य द्यावे. यामुळे शरीराच्या सर्व सांध्यांच्या हालचाली होऊन, जखडलेले शरीर मोकळे होण्यास लाभ होतो.

ज्येष्ठांनी कोणती आसने करावीत?
-वक्रासन (मधूमेहींसाठी, पोटाचे विकार, आम्लपीत्त, अपचन)
-शशांकासन (अपचानाच्या तक्रारींवर लाभकारी)
-गोमुखासन (पोटाचे विकार, मूत्रविकार, प्रोस्टेट ग्लँड्स, मूळव्याध)
-पवनमुक्तासन (अपचनाच्या सर्वच तक्रारींवर लाभकारी)
-मंडुकासन (मधूमेही, पोटाच्या तक्रारींसाठी उपयुक्त)
-एकपाद, द्विपाद चक्रासन : (पोटाच्या विकारांसाठी फार लाभकारी)
-सूर्यनमस्कार (शरीराच्या सर्वच अवयवांना लाभकारी)

रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे
सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या वैश्‍विक महामारीचा मुकाबला करीत आहे. या काळात आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रत्येकानेच योगासन, प्राणायाम करावा. ज्यामुळे शरीर तंदरुस्त राहून, शरीरातील अंतर्गत घटक बळकट होण्यास मदत होईल. परिणामी, रोगप्रतिकारशक्ती वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठांनी सुक्ष्म व्यायाम, बैठे आसने करावीत. ज्यामुळे जखडलेले शरीर मोकळे होण्यास लाभ होईल.
-भगवंतराव वानखडे, योग प्रशिक्षक, वाशीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com