खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा अमरावतीत स्थानबद्ध 

सुरेंद्र चापोरकर
Monday, 16 November 2020

रविवारी (ता. १५) त्यांची सुटका झाली. मुंबई येथे मातोश्रीवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना पोलिसांनी त्यांच्या घरासमोर रोखले व दोघांना पोलिस आयुक्तालयात स्थानबद्ध करण्यात आले.

अमरावती : मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रेल्वेने मुंबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना आज, रविवारी रात्री पोलिसांनी स्थानबद्ध केले. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी तसेच लॉकडाउनच्या काळातील ५० टक्के वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी राणा दाम्पत्याचे आंदोलन सुरू आहे. 

मोझरी येथे आंदोलन केल्याने आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत जमीन घेण्यास नकार दिल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. आमदार रवी राणा यांचे कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.

रविवारी (ता. १५) त्यांची सुटका झाली. मुंबई येथे मातोश्रीवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना पोलिसांनी त्यांच्या घरासमोर रोखले व दोघांना पोलिस आयुक्तालयात स्थानबद्ध करण्यात आले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणे गुन्हा आहे काय, असा सवाल त्यांनी केला. ज्यांनी ही कारवाई केली त्यांच्या विरोधात संसदेत प्रश्न लावून त्यांच्या निलंबनाची मागणी रेटली जाईल, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला. 

गृहमंत्री अनिल देशमुखांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी

 

बडनेरा रेल्वेस्टेशनवरून रविवारी (ता. १५) सायंकाळी राणा यांच्यासह काही शेतकरी आणि कार्यकर्ते विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. 

आशासेविकांसाठी खुषखबर! निवडणुकीची आचारसंहिता संपताच मिळणार थकीत रक्कम
 

विदर्भ एक्सप्रेस रोखल्याची चर्चा 

मुंबईला आंदोलनासाठी जाण्यासाठी निघालेले आमदार व खासदार राणा यांना पोलिसांनी रोखल्यामुळे युवा स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विदर्भ एक्सप्रेस अर्धा तास बडनेरा स्थानकावर रोखल्याची चर्चा आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Navneet Rana, MLA Ravi Rana Detained in Amravati by Police