
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आणि पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे पटेल चांगलेच संतापले आहेत.
भंडारा : सध्या कोणती चौकशी कोण, कुठे कशी लावत आहे, ते काही कळत नाही. एक मात्र खरं की सगळ्यांच्या मागे ईडी लागलेली आहे. आज ना उद्या चौकशी होणारच. त्यामुळे त्याचाही सामना संपूर्ण ताकदीनिशी करण्यात येईल, असे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल म्हणाले. ते भंडाऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही गावाला जोडणारा...
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आणि पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे पटेल चांगलेच संतापले आहेत. परकीय चलनाविषयीच्या फेमा कायद्यांअंतर्गत विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयात तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४० तरुणांना दिला रोजगार
दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावरही ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर त्यांच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे आता यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
हेही वाचा - दीड वर्षांपासून बंद असलेल्या वाळूघाटांचे लिलाव लवकरच, पर्यावरण समितीच्या ऑनलाइन सुनावणीत निर्णय
धानाला ७०० रुपये बोनस -
यंदाही सरकारने धानाला ७०० रुपये बोनस दिला आहे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेच्या हिताची धोरणे भविष्यातही राबविणार आहेत. धानाच्या बाबतीत ज्याप्रमाणे निर्णय झाला त्याचप्रमाणे कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवरही सरकार निर्णय घेणार आहे. मागील भाजप सरकारच्या काळात त्यांनी केलेली पापे आमची सरकार धुऊन काढत आहे.