

MPSC Exam Case Police Inspector Rahul Shire Faces Departmental Inquiry After Incorrect Information Found in Investigation Report
esakal
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदाच्या परीक्षेशी संबंधित गोपनीय कागदपत्रे उघड झाल्याच्या तक्रारीवर करण्यात आलेल्या चौकशीच्या अहवालात चुकीची माहिती नमूद केल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. अहवालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे.