

MPSC Drug Inspector Exam
esakal
सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेने सिंदखेड राजा तालुक्यातील भोसा येथील विजय सदाशिव किंगर (वय ३०) याला २४ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. या प्रकरणात सांगली येथून साजिद संदे या अन्य उमेदवारालाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या ११ झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यातील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या अनधिकृत देवाण-घेवाण प्रकरणी गुन्हेशाखेकडून तपास सुरू आहे. परीक्षेची गोपनीयता व निष्पक्षता भंग करून आर्थिक फायद्यासाठी प्रश्नपत्रिकेची अनधिकृत देवाण-घेवाण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
उमेदवारांना प्रश्नसंच मिळवून देण्यात कथित भूमिका असल्याच्या संशयावरून संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोन मध्यस्थांना मुंबईतून अटक करण्यात आली. यापूर्वी एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे, साहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाल मराठे, प्रवीण पाटील, अमृत पाटील, लोकेश ऊर्फ गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली.
विजय किंगर याचे नाव औषध निरीक्षक पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांच्या यादीत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल असून, मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मुंबई एसआयटी व गुन्हे शाखेचे अधिकारी सिंदखेड राजा येथे दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष इंगळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी तपास पथकाला आवश्यक सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.