

Gadchiroli Electricity Bill Row:
Esakal
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे महावितरण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. ज्या घरात वीज मीटरच बसवण्यात आलेलं नाही अशा घराला तब्बल २ हजार ३६० रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे. घरात मीटर नाही आणि वीज वापरही झालेला नाही. तरीही बिल आल्याने संबंधित ग्राहकाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.