चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा  गळा दाबून खून

विनायक रेकलवार
Tuesday, 22 September 2020

केळझर येथील आशिष चुनारकर याचा गावातीलच वंदना रायपुरे (वय 28) हिच्याशी प्रेमविवाह झालेला होता. त्यांच्या लग्नाला जवळपास अकरा वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. त्यांच्या संसार वेलीवर दोन मोठया मुलीसुद्धा आहेत. असे असतानाही आशिष  नेहमीच वंदनाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारझोड करायचा. 

मूल (जि. चंद्रपूर)  : चारित्र्यावर संशय आणि सतत मारहाण  करणाऱ्या पतीचा खून झाल्याची घटना तालुक्यातील केळझर येथे घडली. या  घटनेमुळे केळझर परिसरात खळबळ उडाली असून, खुनाच्या कटात सहभागी दोन  आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृताच्या पत्नीला उशिरा ताब्यात घेण्यात आले असून, मृताचे नाव आशिष हरिदास चुनारकर (वय 30, रा. केळझर)  असे आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळझर येथील आशिष चुनारकर याचा गावातीलच वंदना रायपुरे (वय 28) हिच्याशी प्रेमविवाह झालेला होता. त्यांच्या लग्नाला जवळपास अकरा वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. त्यांच्या संसार वेलीवर दोन मोठया मुलीसुद्धा आहेत. असे असतानाही आशिष  नेहमीच वंदनाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारझोड करायचा. 

जाणून घ्या - सत्तावीस वर्षीय युवक स्मशानघाटासमोरून गाडी ढकलत घेऊन जात होता, पुढे...
 

प्रेमविवाह असूनही लग्नापासूनच त्याचा त्रास वंदनाला जाणवू लागला. सततच्या या जाचामुळे वंदना त्रासली होती. त्रास सहन करण्याची सहन शक्ती संपल्याने तिने टोकाचे पाऊल उचलण्यचे ठरविले .  माहेर हे गावचेच असल्याने ती नेहमी नवऱ्याने केलेल्या छळाची माहिती द्यायची. एकदा तिने आपल्या माहेरच्या कुटुंबीयांना याचा बंदोबस्त करा, नाहीतर मी आत्महत्या करते असा धमकीवजा इशारा दिला होता.

घटनेच्या दोन दिवसापूर्वी वंदनासोबत आशिषचा वाद झालेला होता. शेवटी त्रासलेल्या सर्वानी आशिषचा काटा काढायचा डाव आखला. त्यासाठी वंदनाच्या भावाने आपल्या एका मित्राला सोबत घेतले. रविवारी आशिषच्याच मोटारसायकलने केळझर ते केसलाघाट या एक किमीच्या सुनसान मार्गावर नेण्यात आले. त्या ठिकाणी खाणे-पिणे झाल्यानंतर वंदनाच्या भावाच्या  मित्राने आशिषचा गळा दाबून घटनास्थळीच खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जवळपास असलेल्या एका पाण्याच्या खड्ढयात फेकून दिला.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर
 

या प्रकरणात  वंदनाचा भाऊ संदीप वसंत रायपुरे (वय 28, रा केळझर) आणि त्याचा मित्र रणदिर सिंग रविंद्र सिंग भौंड (वय 21, रा केळझर) यांना अटक करण्यात आली. आशिषची पत्नी वंदनाला उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे.  घटना स्थळावरून आरोपींची चपल आणि झुरके घेतलेले सिगारेटचे तुकडे ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे आणि  पोलिस निरिक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलिस करीत आहेत. अकरा वर्षापूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा शेवट गळा दाबून खूनाच्या प्रकरणाने झाल्याने केळझर परिसरात या प्रकरणाची चर्चा आहे. 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a husband who Skeptics his wife character