आई सतत राहायची आजारी; जादूटोणा केल्याच्या संशयातून भावांनी वृद्धाचे धडापासून मुंडके केले वेगळे

Murder of old man at Amravati
Murder of old man at Amravati
Updated on

वरूड (जि. अमरावती) : बकऱ्या चारण्यासाठी गावाबाहेरील शेतात गेल्या 72 वर्षीय वृद्धाचा दोन सख्या भावांनी अंधश्रद्धेतून खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. शेंदुर्जनघाट पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून आरोपींचा शोध घेतला व ताब्यात घेतले आहे. 

पुसला येथील बाळकृष्ण भोलाजी भारसाकळे हे शेतमजुरी आणि बकऱ्या चारण्याचे काम करीत होते. नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे त्यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास गावालतच्या खरोळा शेतशिवारामध्ये बकऱ्या चारण्यासाठी नेल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शेतातून येणाऱ्या शेतमजुरांना हरीदास पाटील यांच्या शेतामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला होता. बाळकृष्ण यांचे डोकं आणि एक हात हा शरीरापासून वेगळा केला होता.

याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी रघुनाथ बाळकृष्ण भारसाकळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सोमवारी पहाटेपासून ठाणेदार श्रीराम गेडाम, पोलिस उपनिरीक्षक सचिन कानडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय लेव्हरकर, लक्ष्मण साने, अतुल म्हस्के, शैलेश घुरडे, रत्नदीप वानखडे, पंकज गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या खुनाचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्रे गतीने फिरवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता खुनाचे रहस्य उलगडले. 

जादूटोणा​ केल्याचा संशय

गावातीलच नेहारे कुटुंबातील 40 वर्षीय महिला सतत आजारी राहत होती. तिला मृत बाळकृष्ण भारसाकळे याने करणी केल्याचा संशय नेहारे परिवाराला होता. नेहारे परिवारात राम राजाराम नेहारे (18) आणि त्याचा भावाने बाळकृष्ण याला कायमचे संपविण्याचा कट रचला आणि दोघांनीही बाळकृष्ण यांचा अत्यंत निर्दयतेने खून केला. दोन्ही भावांनी पोलिसांनी आपणच खून केल्याची कबुली दिली.

आरोपींमध्ये अल्पवयीनचा समावेश

शेंदूरजनाघाट पोलिसांनी दोन्ही भावंडांना ताब्यात घेतले असून, खुनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र सुद्धा जप्त केले आहे. दोघा भावापैकी एक अल्पवयीन आहे. राम नेहारे याला अटक करण्यात आली असून, अल्पवयीनास नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्रीराम गेडाम, पोलिस उपनिरीक्षक सचिन कानडे आदी करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com