अमरावतीत शाब्दिक चकमकीचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर युवकाचा खून

Murder of a youth in Amravati district
Murder of a youth in Amravati district

अमरावती : जेवडनगरात जुन्या वैमनस्यातून युवकाचा खून झाला. बुधवारी (ता. २) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. बदल्याच्या भावनेतून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विवेक उर्फ गोलू विलास चोपकर (वय २१, रा. जेवडनगर, अमरावती) असे मृत युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी रोहित अशोक यादव (वय २०), अजय गणेश यादव (वय ३२), जय सुनील कडूसह एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीनास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, जय कडू हा फरार आहे. सतीश रामभाऊ पालवे (वय ३२) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.

बऱ्याच दिवसांपासून जेवडनगर परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा वरचष्मा आहे. त्यातून त्यांच्या भांडणे होणे ही नित्याचीच बाब झाली. विवेक उर्फ गोलू चोपकर याचे परिसरातील लोकांसोबत वाद सुरू होते. बुधवारी (ता. दोन) पुन्हा त्यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर भांडण झाले. रात्रीच्या सुमारास विवेक उर्फ गोलू यास गाठले. काहींनी पकडून ठेवले. संपविण्याची धमकी दिली. गळ्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले.

विवेक उर्फ गोलू याच्यावर हल्ला होत असल्याचे बघून घटनास्थळी असलेले सतीश पालवे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, अल्पवयीनासह चौघांनी पालवे यांनाही मध्यस्थी केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. विवेकचा खून केल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. हल्ल्यानंतर काही तासातच पोलिसांनी दोघांना अटक केली. अल्पवयीनास ताब्यात घेतले. एक अद्याप फरार आहे.

बदल्यांच्या भावनेतून खून
गत काही दिवसांपासून विवेक उर्फ गोलू याचा काही लोकांसोबत वाद सुरू होता. बदल्यांच्या भावनेतून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
- किशोर सूर्यवंशी,
पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे

कदाचित जीव वाचला असता

विवेक उर्फ गोलू याला दोनवर्षासाठी बाहेर जिल्ह्यात हद्दपार केले होते. त्याच्या हद्दपारीला स्थगिती मिळाली. हद्दपारी सुरू असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com