यवतमाळ जिल्ह्यातील पालिका निवडणुकीची लगीनघाई

यवतमाळ जिल्ह्यातील पालिका निवडणुकीची लगीनघाई
Summary

तज्ज्ञांच्या मते आधी जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : कोरोना (Corona) महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील नगरपंचायतीची निवडणूक (nagar panchayat elections) स्थगित करण्यात आली आहे. त्यांची मुदत संपवून बराच कालावधी झाला आहे. मात्र, अजूनही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. अशातच आता नगरपालिका निवडणुकीचा येत्या ऑक्टोबर महिन्यात बिगूल वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकसदस्यीय प्रभाग रचनेमुळे यंदा अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तज्ज्ञांच्या मते आधी जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे. (nagarpanchayat elections in the district have been postponed due to the growing contagion of the corona epidemic)

यवतमाळ जिल्ह्यातील पालिका निवडणुकीची लगीनघाई
‘आठ’ तारखेचा ‘नाट’ : यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत विजेचे नऊ बळी

जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या निवडणुका वर्षभरापासून स्थगित आहेत. कोरोनाच्या विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वतयारी प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे. ऐन शेवटच्या टप्प्यातच कोरोनाचे रुग्ण वाढलेत. त्यामुळे या निवडणुकांना ब्रेक लावण्यात आला. त्यानंतर आता जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांची मुदतही शेवटच्या टप्प्यात असून, येत्या ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील काही नगरपालिकांची मुदत संपणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याची माहिती आहे. निवडणुका होण्याची शक्यता वाढल्याने इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पालिका निवडणुकीची लगीनघाई
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; दुसऱ्या दिवशीही मुसळधार

यावेळी एकसदस्यीय प्रभागरचना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीला अनेकांनी सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका व नगरपंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे आता या नगरपंचायती व नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीचे धोरण ठरले नसले तरी भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी आघाडी प्रयत्न करीत आहे. निवडणुकीची चर्चा बाहेर येताच नगरसेवकदेखील आपापल्या प्रभागातील कामांना लागलेले दिसत असून, निवडणुकीची तयारीदेखील सुरू केलेली आहे. (nagar panchayat elections in the district have been postponed due to the growing contagion of the corona epidemic)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com