esakal | नव्या वर्षात नगरपंचायतीच्या निवडणुकांचा मुहूर्त; भाजप आमदारांची कसोटी, राष्ट्रवादीमध्ये सन्नाटा
sakal

बोलून बातमी शोधा

nagarpanchayat election will held in new year 2021

जिल्ह्यातील झरी जामणी, राळेगाव, महागाव, कळंब, बाभूळगाव व मारेगाव या सहा नगरपंचायतींची निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. 'मिशन बिगेन अगेन'अंतर्गत प्रशासकीयस्तरावर कामाला गती आल्यानंतर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. 

नव्या वर्षात नगरपंचायतीच्या निवडणुकांचा मुहूर्त; भाजप आमदारांची कसोटी, राष्ट्रवादीमध्ये सन्नाटा

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. शिवसेना, काँग्रेस व भाजपने तयारी सुरू केली आहे. असे असले तरी नगरपंचायतींच्या निवडणुका 2021मध्ये जाण्याची शक्‍यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण व सोडत कार्यक्रमांत बदल केला आहे. परिणामी पूर्वीच्या कार्यक्रमानुसार येत्या 24 डिसेंबरला प्रसिद्ध होणारी अंतिम अधिसूचना आता 30 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या 'आनंदवन'मधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?

जिल्ह्यातील झरी जामणी, राळेगाव, महागाव, कळंब, बाभूळगाव व मारेगाव या सहा नगरपंचायतींची निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. 'मिशन बिगेन अगेन'अंतर्गत प्रशासकीयस्तरावर कामाला गती आल्यानंतर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपनंतर शिवसेनेने नगरपंचायतींसाठी निरीक्षक जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. सहा नगरपंचायतीत भाजप, शिवसेना व काँग्रेसची ताकद जवळपास सारखीच आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असले तरी आता या निवडणुकांना काहीकाळ अधिक लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - आनंदवनातील वाद : शीतल यांचे आरोप तथ्यहीन, आमटे...

राज्य निवडणूक आयोगाने 12 ऑक्‍टोबर 2020ला प्रभागरचना, आरक्षण व सोडत कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात निवडणूक आयोगाने अंशत: बदल केला आहे. परिणामी आठ दिवस कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. हरकती व सूचनांवर चार डिसेंबरला जिल्हाधिकारी सुनावणी घेणार होते. नव्या कार्यक्रमानुसार आता ही सुनावणी दहा डिसेंबरला होईल. याशिवाय, हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन विभागीय आयुक्तांना अहवाल पाठविणे, अंतिम प्रभासरचनेस मान्यता, अंतिम अधिसूचना या कार्यक्रमांतही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नगरपंचायत निवडणुकीचा बिगूल नवीन वर्षात फेब्रुवारीनंतर वाजण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - ‘डाकू डब्बल सिंह झाला अक्कल सिंह’; यवतमाळच्या मातीत ‘शोले’चा रिमेक

भाजप आमदारांची कसोटी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्नाटा -
निवडणूक होणाऱ्या सहाही नगरपंचायतीत भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे सत्ताबदलानंतर या ठिकाणांच्या निवडणुका आमदारासाठी प्रतिष्ठेच्या होणार आहेत. भाजपने तसे प्रयत्न सुरू करून नियोजनात आघाडी घेतली आहे. शिवसेना व काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. या पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्नाटा असल्याचे दिसून येत आहे.

loading image