नागभीडकरांना रोजचाच मनस्ताप! दोन किलोमीटरवरील स्थानक कुचकामी

नागभीडकरांना रोजचाच मनस्ताप! दोन किलोमीटरवरील स्थानक कुचकामी

नागभीड (जि. चंद्रपूर) : तालुकास्तरावरील बसस्थानक तालुक्याचे वैभव असते. नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व सुविधांनी सुसज्ज बसस्थानकास लोकप्रतिनिधींची प्राथमिकता असणे गरजेचे आहे. मात्र, नागभीड येथील बसस्थानक मध्यवर्ती ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हे बसस्थानक प्रवाशांनी नाकारले. प्रवासीच नाही म्हटल्यावर बसही या स्थानकाकडे फिरकत नाही. स्थानिक आमदारांच्या प्रयत्नाने विश्रामगृहाच्या ठिकाणची जागा बसस्थानकासाठी हस्तांतरित झाली. परंतु, सरकार बदलल्याने निधीअभावी काम रखडले. बसस्थानकावर मूलभूत सुविधाच नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. (Nagbhidkar's-daily-annoyance-due-to-lack-of-bus-stand!)

स्वच्छतागृहाच्या गैरसोयीमुळे महिला, विद्यार्थिनींना बसचा प्रवासच नकोसा वाटतो. बसस्थानकापासून सार्वजनिक शौचालय २०० ते ३०० मीटर अंतरावर आहे. नगर परिषदेच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी फिरते शौचालय ठेवण्यात आले. मात्र, स्वच्छतेचा अभाव आणि पाण्याची कमतरता यामुळे कुणीही तिकडे फिरकत नाही. नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असण्यासोबतच रेल्वेचे मोठे जंक्शन असताना साधे बसस्थानक नसावे, ही नागभीडनगरीची शोकांतिका आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी.

नागभीडकरांना रोजचाच मनस्ताप! दोन किलोमीटरवरील स्थानक कुचकामी
‘ट्विट’वार : आम्ही कशाला म्हणणार ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’

बसस्थानकाच्या मागणीसाठी नागभीड येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल, डॉ. विजय आखाडे, कमरुद्दीन धम्मानी यांच्या नेतृत्वात नागभीड येथील टी-पॉइंट चौकात मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला त्यावेळी हिंसक वळण लागले हाेते. पाेलिसांना लाठीहल्ला करावा लागला. अनेक आंदाेलक जखमी झाले. काहींना अटक झाली. या आंदोलनाचे फलित म्हणून १९९१ साली नागभीड येथे बसस्थानक मंजूर झाले. शहरापासून दाेन किलाेमीटर अंतरावर सुसज्ज बसस्थानकाचे उद्धाटन तत्कालीन वन आणि आदिवासी विकास राज्यमंत्री श्यामबाबू वानखेडे यांनी २३ मार्च १९९१ राेजी केले. बसस्थानकालगत तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, गो. वा. महाविद्यालय तसेच प्रसिद्ध शिवटेकडी आहे. परंतु प्रवाशांच्या दृष्टीने ते गैरसाेयीचे आहे. मुख्य शहरापासून लांब असल्याने फारसे कोणी तिकडे जात नव्हते. कुठलीही बस पकडायची असेल तर शहरातील राम मंदिर चौकालाच प्रवाशांचे प्राधान्य असते.

बसचालक, वाहकांची रोजचीच जोखीम

तीस वर्षांपासून काेट्यवधीचे बसस्थानक पांढरा हत्ती बनले आहे. १ लाख ३५ हजार लोकसंख्या असलेल्या आणि १५० गावे समाविष्ट असलेल्या नागभीड तालुक्याला सर्व सोयीयुक्त बसस्थानक नसणे, ही शोकांतिका आहे. या तीस वर्षांच्या काळात सर्व बसेस राममंदिर चौकातूनच बदली हाेतात. हा चौक वर्दळीचा आहे. अतिशय अरुंद अशा रस्त्यावर बस पलटविण्याचे अतिशय जोखमीचे काम चालक आणि वाहक गेल्या कित्तेक वर्षांपासून करीत आहेत. अनेकदा किरकोळ अपघातसुद्धा झाले. प्रवाशांना थंडी, ऊन, वारा, पाऊस झेलत राममंदिर चौकात उभे राहावे लागते. स्वच्छतागृहाची सोय नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. असुविधांमुळे रात्रीच्या वेळी बसने प्रवास नकोच, असे म्हणण्याची वेळ महिलांवर येते. नागभीडच्या लोकप्रतिनिधींनी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या जागेवर विश्रामगृह बांधले आणि विश्रामगृहाच्या जागेवर बसस्थानक बांधले. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणी एकमेकांच्या जागेवर स्थलांतरित करावी, अशी मागणी होत आहे. परंतु त्याकडे कुणाचेही लक्ष नाही.

नागभीडकरांना रोजचाच मनस्ताप! दोन किलोमीटरवरील स्थानक कुचकामी
#UPMeinGundaraj : वडेट्टीवार, ठाकूर यांचे टार्गेट ‘भाजप’

निव्वळ घाेषणाच; प्रत्यक्षात कृती नाहीच

बसस्थानकाची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर हाेत आहे. हे लक्षात येताच गतवर्षी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी युतीचे सरकार असताना बसस्थानकाची जागा विश्रामगृहासाठी राज्य परिवहन महामंडळकडे हस्तांतरित केली. सुमारे पाच काेटी रुपयांचे सुसज्च असे बसस्थानक हाेईल, अशी घाेषणा केली. दोन वर्षांपासून विश्रामगृहाच्या ठिकाणी बसस्थानक स्थलांतरित झाले. परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचे बांधकाम सुरू झालेले नाही. या ठिकाणी प्रवाशांना नरकयातना साेसाव्या लागत आहेत. तीन खासगी उच्च माध्यमिक शाळा, दोन महाविद्यालय असून, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी नागभीडला येत असतात. मात्र, बसस्थानकावर योग्य सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा विद्यार्थी नागभीडऐवजी ब्रह्मपुरीचा रस्ता धरतात.

नागभीड शहरातील बसस्थानक समस्यांच्या विळख्यात आहे. ना बसायला निवारा, ना प्रसाधनगृह. यामुळे बाहेरगावाहून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनी तसेच स्त्रियांना समस्येचा सामना करावा लागतो. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष नाही. त्यामुळे बालकांना उघड्यावर स्तनपान करावे लागते. बसस्थानक नसल्यामुळे कोणती बस केव्हा येणार, कुठे थांबणार माहिती राहात नाही. साधी बसची चौकशी करायला सूचना कक्ष नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. योग्य ठिकाणी बसस्थानक बांधून प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवाव्या. बसस्थानकावर मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे.
- सोनाली दांडेकर, नगरसेविका नागभीड नगरपरिषद
नागभीडकरांना रोजचाच मनस्ताप! दोन किलोमीटरवरील स्थानक कुचकामी
प्रेयसीने केली आत्महत्या ; प्रियकरासह पाच जणांवर गुन्हा दाखल
पावसापासून बचाव करण्यासाठी साधे छत नाही. परिसर प्रचंड दुर्गंधी येते. स्थानिक लोकप्रतिनिधी बसस्थानकची नवीन इमारत लवकरच होणार असे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. नवीन इमारतीबाबत काही जण मोबाईल ग्रुपवर वारंवार मॕसेज टाकून जनतेची दिशाभूल करतात. शहरातील अनेक रस्ते चिखलमय आहेत. या गलथान कारभारामुळे जनता त्रस्त आहे. नागभीडसारख्या मध्यवर्ती ठिकाणच्या बसस्थानकाची अशी वाईट अवस्था म्हणजे लाजीरवाणी बाब आहे.
- आशा अरुण गायकवाड, नगरसेविका नागभीड

(Nagbhidkar's-daily-annoyance-due-to-lack-of-bus-stand!)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com