Nagpur-Mumbai Flight Service Suspended
esakal
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. एअर इंडियाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत नागपूर-मुंबई विमानसेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढता संचालन खर्च, विमानांच्या उपलब्धतेचे नियोजन आणि अंतर्गत वेळापत्रकातील बदल यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.