esakal | विदर्भात सर्वाधिक पाऊस पडला या जिल्ह्यात; दोन जिल्हे अजूनही कोमात, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur reached the average a month and a half ago

विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद अर्थातच नागपूर शहरात झाली आहे. येथे २२ ऑगस्टपर्यंत तब्बल १०१५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत चार महिन्यांत विदर्भात साधारणपणे ९४३ मिलिमीटर पाऊस पडतो. नागपूरने दीड महिन्यापूर्वीच पावसाची सरासरी गाठली. त्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ७३५ मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे.

विदर्भात सर्वाधिक पाऊस पडला या जिल्ह्यात; दोन जिल्हे अजूनही कोमात, वाचा

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : जवळपास दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे विदर्भाने सरासरी गाठली आहे. नागपूर शहरात तब्बल एक हजार मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. अकोला व अमरावतीचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात एक जूनपासून आतापर्यंत ६६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो सरासरी (७०५ मिलिमीटर) पावसाच्या केवळ पाच टक्के कमी आहे. हवामान विभागाच्या भाषेत हा सरासरी पाऊस मानला जातो.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद अर्थातच नागपूर शहरात झाली आहे. येथे २२ ऑगस्टपर्यंत तब्बल १०१५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत चार महिन्यांत विदर्भात साधारणपणे ९४३ मिलिमीटर पाऊस पडतो. नागपूरने दीड महिन्यापूर्वीच पावसाची सरासरी गाठली. त्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ७३५ मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे.

विदर्भात सर्वाधिक पाऊस वाशीम जिल्ह्यात ६८७ मिलिमीटर झाला. जो सरासरीच्या (५८७ मिलिमीटर) १७ टक्के अधिक आहे. अकोला व यवतमाळ जिल्हे अजूनही कोमात आहेत. येथे अनुक्रमे २४ व २१ टक्के कमी पाऊस झालेला आहे. अमरावती जिल्ह्यातही परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. येथे आतापर्यंत १९ टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाळ्याचा अद्याप सव्वा महिना शिल्लक असल्याने तूट भरून निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उघडून तर बघा - चिमुकल्यांची आर्तहाक... ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...'

विदर्भातील धरणेही तुडुंब

गतवर्षी व आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे विदर्भातील मध्यम व मोठी धरणेही तुडुंब भरली आहेत. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारे पेंच नदीवरील तोतलाडोह धरण काठोकाठ भरले आहे. धरणाची सध्याची स्थिती बघता पुढील दोन वर्षे नागपूरकरांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार नाही. अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धारणाचीही ३३ दारे उघडण्यात आली आहेत. विदर्भातील इतरही धरणांची स्थिती समाधानकारक आहे. महाराष्ट्रातील जलसाठ्यातही वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, सद्यःस्थितीत एकूण पाणीसाठा ७५ टक्के असून, मृतसाठाही ९५ टक्के इतका आहे.

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

विदर्भातील आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जिल्हा सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस तूट
नागपूर ६७४ मिमी ७३५ मिमी +९
वर्धा ६५० मिमी ६०७ मिमी -७
अमरावती ६३७ मिमी ५१७ मिमी -१९
भंडारा ८६३ मिमी ९१७ मिमी +६
गोंदिया ९१० मिमी ८३७ मिमी -८
अकोला ५१७ मिमी ३९१ मिमी -२४
वाशीम ५८७ मिमी ६८७ मिमी +१७
बुलडाणा ४८० मिमी ५५० मिमी +१५
यवतमाळ
६०८ मिमी  
४८० मिमी -२१
चिरोली
९६३ मिमी  
९३७ मिमी -५
चंद्रपूर
८०६ मिमी  
७४३ मिमी -८

संपादन - नीलेश डाखोरे

loading image