आठ हजार कुटुंबाच्या संसाराची गाडी येणार रुळावर, पथविक्रेत्यांना सव्वा आठ कोटींचे 'बूस्ट'

10 thousand rupees sanctioned to each street vendors by nagpur municipal corporation
10 thousand rupees sanctioned to each street vendors by nagpur municipal corporation

नागपूर : लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाल्याने उपासमारीची झळ सोसणाऱ्या पथविक्रेत्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीअंतर्गत सव्वा आठ कोटी रुपयांचे 'बूस्ट' मिळाले. त्यामुळे आठ हजारांवर पथविक्रेत्यांच्या संसाराची गाडी रुळावर येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून आठ हजारांवर पथविक्रेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे खेळते भांडवल मंजूर करण्यात आले आहे. 

कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनमध्ये पथविक्रेत्यांचे (हॉकर्स) व्यवसाय बंद झाले होते. त्यांच्या व्यवसायांना उभारी मिळावी तसेच त्यांच्या जीवन जगण्याचा मार्ग सोपा करण्यासाठी केंद्र सरकारने 'पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. महापालिकेद्वारे ही योजना शहरात राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत ८२५५ पथविक्रेत्यांसाठी ८ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचे खेळते भांडवल मंजूर करून दिले. प्रति हॉकर्स १० हजार रुपये व्यवसायाच्या उभारीसाठी देण्यात येत आहे. ५४३२ पथविक्रेत्यांना कर्जाचे वितरणही करण्यात आले आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या मार्गदर्शनात शनिवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये पथविक्रेत्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

समारंभामध्ये मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त प्रकाश वराडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक पंकज देशमुख उपस्थित होते. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी पथविक्रेत्यांशी संवाद साधला. सभागृह परिसरात विविध राष्ट्रीयकृत बँकांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवरून पथविक्रेत्यांच्या अडचणी सोडवून त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय डिजिटल व्यवहाराचीही माहिती बँकांच्या प्रतिनिधीमार्फत पथविक्रेत्यांना देण्यात आली. शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नागपूर महानगपालिकेद्वारे दहाही झोनमध्ये विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे. 

डिजिटल व्यवहारातून कॅशबॅक -
डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून व्यवसाय केल्यास पथविक्रेत्यांना वर्षाला १२०० रुपये कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यात मिळालेले १० हजार रुपये खेळते भांडवली कर्जाची नियमित परतफेड केल्यास भविष्यात २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतही कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड केल्यास व्याजामध्ये ७ टक्के अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. यासाठी बँकांद्वारे पथविक्रेत्यांना 'क्यूआर कोड' वितरित करण्यात आला. 

नागपूर मनपा राज्यात दुसऱ्या स्थानावर - 
नागपूर मनपाद्वारे आतापर्यंत एकूण २१ हजार १४१ अर्ज भरण्यात आले. यातील ८ हजार २५५ अर्ज मंजूर झाले असून ५ हजार ४३२ पथविक्रेत्यांना कर्ज वितरित करण्यात आले. अर्ज मंजुरी आणि कर्ज वितरणात नागपूर महानगरपालिका राज्यात दुसऱ्या तर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com