लाचखोरांनाही मिळतेय निलंबनातून ‘मुभा’; १४८ जण पदावरही कायम

लाच घेताना रंगेहाथ सापडूनही कोणतीही कारवाई न होता विविध सरकारी विभागातील १४८ ‘लोकसेवक’ पदावर कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
Bribe
Bribe bribe

नागपूर : लाच घेताना रंगेहाथ सापडूनही कोणतीही कारवाई न होता विविध सरकारी विभागातील १४८ ‘लोकसेवक’ पदावर कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती आहे. गेल्या ५ वर्षांत वेगवेगळ्या कारवाईतील हे कर्मचारी आहेत, तर २६ जणांना शिक्षा होऊनही बडतर्फ केले नाही, असे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील आकडेवारीवरून दिसून येते. सरकारच्या ढिसाळ कारभाराचा हा उत्तम नमुना असून भ्रष्टाचारविरोधी आंदोलन फक्त देखाव्यापुरते आहे काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. तरीही लाचेच्या घटना कुठे ना कुठे घडतातच. दुसरीकडे लाच घेताना अटक झाल्यावर मोठी कारवाई होते, हा गैरसमजच आहे. गेल्या पाच वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक सापळे रचून १४८ सरकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली. सर्वच लाचखोर न्यायालयात जाऊन जामिनावर सुटले. मात्र, त्यांच्यावर कार्यालयाअंतर्गत निलंबनाची कारवाईसुद्धा झाली नाही. राज्यातील २० वेगवेगळ्या खात्यांतील १४८ लाचखोर असून यात शिक्षण व क्रीडा विभागाचे ३१जण आहेत तर नगर विकासचे ३१ लाचखोर आहेत. राज्यातील आठ विभागात नागपूर विभागाचे सर्वाधिक ४८ लाचखोर असून त्या खालोखाल नांदेड विभागातील २६जण आहेत.

Bribe
Movie Review : शेतकऱ्यांच्या वेदनेचा हुंकार 'फास'

शिक्षा होऊनही बडतर्फी नाही!

लाच घेतल्यानंतर आरोप सिद्ध झाले आणि त्यांना शिक्षाही झाली. त्या प्रकरणात राज्य सरकारने त्यांच्या बडतर्फीची कोणतीही कारवाई करण्यात आली, असेही २६ लाचखोर कर्मचारी असून त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून अभय मिळत असल्याची चर्चा आहे. यात नांदेड विभाग आघाडीवर असून संख्या आठ आहे तर नागपूर विभागात असे पाच कर्मचारी आहेत, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील आकडेवारीवरून दिसून येते.

२६ सरपंचही लाचखोर

गाव विकासाचा आव आणून राजकारणाच्या माध्यमातून श्रीमंत होणाऱ्या २६ सरपंच आणि उपसरपंचांनाही लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. मात्र, न्यायालयात जाऊन त्यांनी जामीन घेतला आहे. त्यानंतर त्यांच्यावरही कोणताही कारवाई झाली नाही. यातील काहींचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. तसेच त्यांना अटक करण्यात येते. दरम्यान संबंधित विभागाला झालेल्या कारवाईची माहिती दिली जाते. निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार संबंधित विभागाचा आहे. आरोपींवर संबंधित विभागाने कारवाई करावी, अशी अपेक्षा असते.

- राकेश ओला, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com