आदिवासी बांधवांना देणार दोन हजारांचे रेशन, पण कर्मचाऱ्यांमध्ये रोष

ration
rationration

नागपूर : कोरोनाकाळ (coronavirus) लक्षात घेता राज्य शासनाने आदिवासी बांधवांना (tribal community) खावटी योजनेअंतर्गत ४ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दोन हजार रुपये डीबीटी (थेट लाभार्थी हस्तांतरण) (DBT scheme) तर दोन हजार रुपयांचे रेशन आहे. आदिवासी विभागातील (tribal department) शेकडो कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, अनेकांचा मृत्यू झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष असून रेशनचे दोन हजार रुपयेही डीबीटी करण्याची मागणी होत आहे. (2000 rs ration will give to tribal community)

ration
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना? 'या' वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा

राज्य शासनाने खावटी योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांना दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, तो वेळेत देण्यात आला नाही. यावरून शासनावर अनेकांनी टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर शासनाने निधीची तरतूद केली. दरम्यान, कोरोनाच्या नियंत्रणासाठी सरकारे पुन्हा लॉकडाउन केले. सामान्य नागरिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता मदत देण्याचे जाहीर केले. त्यामुळे आदिवासी बांधवांना पुन्हा दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. प्रथम चार हजार रुपये डीबीटी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर शासनाने दोन हजार रुपयांचे रेशन देण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता निविदाही काढण्यात आली. या निविदा प्रक्रियेवरही काहींकडून आक्षेप घेण्यात आला. आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांना या रेशनचे वाटप करायचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेकडो कर्मचाऱ्यांना लागण झाली असून अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात योजना राबविताना अनेक आजारांची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com