नागपुरातील २५ टक्के हॉटेल 'लॉक', ६० टक्केच व्यवसाय

hotel
hotelRepresentative Image

नागपूर : तब्बल दोन वर्षांपासून कोरोनाचे (coronavirus) संकट घोंघावत आहे. त्याचा फटका सर्वच व्यवसायाला बसला असून अनेक उद्योग धंदे बंदही पडले अथवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. झपाट्याने वाढणारा व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉटेल उद्योगाला (hotel industry) सर्वाधिक फटका बसला. दोन्ही लाटेत शहरातील २५ टक्के हॉटेल्स बंद पडल्याची माहिती पुढे आली आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता (third wave of corona) व्यक्त केली जात असल्याने कुशल कामगारांची अडचण जाणवू लागली आहे. (25 percent hotel lock due to lack of workers in nagpur)

hotel
रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी : मेडिकलचे मुख्यप्रवेशद्वार बंद

एका हॉटेलसाठी कामगारांचे पगार, देखभाल, अन्नधान्य, भाजीपाला, डाळी, गहू, तांदूळ, तेल यांची नियमित खरेदी, जागेचे भाडे, विजेचे बिल, सरकारी कर, परवाना शुल्क, महापालिकेचे शुल्क असे बंधनकारक खर्च आहेतच. यावर बँकेचे हप्ते सव्याज फेडावे लागतात. गेल्या काही महिन्यांत पेट्रोल, डिझेल दरवाढीने उच्चांक गाठल्याने वाहतुकीचा खर्च वाढून खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाले, धान्यांचे भाव वाढले. रोज उत्पन्न मिळवायचे, तर हॉटेल चालविले पाहिजे. त्यासाठी खाद्यपदार्थांना आवश्यक कच्चामाल खरेदी, कामगार, विजेचा वापर अपरिहार्य आहे. त्यानंतरही ग्राहक आला, तरच व्यवसाय होणार. कोरोनामुळे गेल्या वर्षभरातील किमान नऊ ते दहा महिने हॉटेल बंदच होती. त्यानंतर पार्सल सेवेला परवानगी मिळाली होती. घरी पार्सल नेण्याची सवय अद्याप सर्व ग्राहकांच्या अंगवळणी पडलेली नाही. त्यामुळे दिवसभर आठ ते बारा तास हॉटेल सुरू ठेवूनही फक्त २० ते ३० टक्केच व्यवसाय होत होता. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बंधनकारक खर्चाची तोंडमिळवणी करायची कशी अशी अडचण होती. आजपासून रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. त्यातून गणित सुटेल अशी अपेक्षा हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली.

पुढे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरगावी गेलेले कुशल कारागीर अद्यापही परतलेले नाहीत. कुशल आणि अकुशल अशा दोन्ही कारागिरांचा वानवा सध्या जाणवू लागला आहे. ही अडचण लक्षात घेता अनेकांनी अद्यापही हॉटेल सुरू केले नाहीत. ज्यांनी सुरू केला आहे त्यांनी टेबलची संख्या साठ ते सत्तर टक्क्यावर आणली आहे. शहरात २००० पेक्षा अधिक हॉटेल होते. त्यातील २५ टक्क बंद पडले आहेत. त्यात अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू केलेल्या सावजी हॉटेलची संख्या अधिक आहे. कोरोनाची भीती सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात अद्यापही असल्याने ग्राहकांची हॉटेलमधील वर्दळ कमी झालेली आहे, असे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश दवे यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com