
नागपूर : ४०२८ नवे कोरोनाबाधित
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच प्रशासनाकडून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांच्या चाचण्यांवर भर दिला जात आहे. मात्र त्याच तुलनेत जिल्हा बाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी (ता.२५) जिल्ह्यात ४ हजार २८ नव्या बाधितांची १०० बाधित जिल्ह्याबाहेरचे आहेत. आतापर्यंत जिल्ह्याबाहेरच्या साडेआठ हजार बाधितांची नोंद नागपुरात झाली. सध्या जिल्ह्याबाहेरील ३३७ बाधित नागपुरात उपचार घेत आहेत.
हेही वाचा: Punjab Election 2022 : माजी उपमुख्यमंत्री बादल यांचे मुख्यमंत्री चन्नी यांना आव्हान
तिसऱ्या लाटेत जिल्ह्यात १९ जानेवारीपासून मृत्युसत्र सुरू आहे. मंगळवारी सहा जण दगावले. यामुळे बाधितांची मृत्युसंख्या १० हजार १८३ झाली. तिसऱ्या लाटेत अवघ्या पंधरा दिवसात ६१ जण दगावले. मागील दोन दिवसांपासून दररोज ११ हजार चाचण्या होत आहे. मंगळवारी झालेल्या ११ हजार ३७७ चाचण्यांमध्ये ४ हजार २८ जण बाधित आढळले. यामुळे आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख ४३ हजार ६४ वर पोहोचला. सध्या जिल्ह्यात २९ हजार १५२ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यात शहरातील २२ हजार १४६ तर ग्रामीणमध्ये ६ हजार ६६९ आहे. जिल्ह्याबाहेरील ३३७ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. २३८८७ कोरोनाबाधित गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
हेही वाचा: UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!
कोरोनाचे तिसऱ्या लाटेतील मृत्यू
११ जानेवारी - १
१२ जानेवारी - १
१३ जानवारी - १
१४ जानेवारी - ३
१५ जानेवारी - १
१६ जानेवारी - ३
१७ जानेवारी - ४
१८ जानेवारी - ०
१९ जानेवारी - ५
२० जानेवारी - ६
२१ जानेवारी - ७
२२ जानेवारी - ८
२३ जानवारी - ९
२४ जानेवारी - ६
२५ जानेवारी - ६
Web Title: 4028 New Corona Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..