esakal | 'ते' ७५ जण सेवा द्यायला आले अन् घरी परतलेच नाहीत, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास

बोलून बातमी शोधा

75 corona worriers died due to corona till date in nagpur

कोरोना संकटाने लोकांना नात्यापासून दूर केले. त्यांना कोरोना योद्ध्यांना अखेरच्या क्षणी आपल्या माणसांशी भेटता आले नाही. त्यांच्या अंत्यसंस्कारालाही कुणाला जाता आलं नाही. केवळ चेहरा बघून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा अंत्यसंस्कार उरकून घेतला. या कोविड शहिदांना अखेरची सलामीही देता आली नाही. 

'ते' ७५ जण सेवा द्यायला आले अन् घरी परतलेच नाहीत, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना संकटकाळात डॉक्टर परिचारिका कोरोनाबाधित नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी जसे वॉर्डात लढत आहेत. त्याच धर्तीवर पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णवाहिका चालक, आशा वर्कर, अटेन्डन्ट, सफाई कामगार, पोलिस हे फ्रंटलाईन वर्कर्स जिवाची पर्वा न करता रस्त्यावर कोरोना योद्धे म्हणून सेवा देत आहेत. कोरोना काळात कोविड योद्ध्यांनी या फ्रन्टलाईन वर्करनी दिवस रात्र मेहनत घेतली. अनेकांना कोरोनाने विळख्यात घेतले. रुग्णालयात उपचार घेणारे जिल्ह्यातील सुमारे ७५ पेक्षा अधिक कोविड योद्धे (फ्रन्टलाईन वर्कर) घरी परतलेच नाहीत. रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

हेही वाचा - Video : ‘राज्य सरकारने दोन दिवसांचे म्हणत सात दिवसांचे लॅाकडाउन लादून फसवणूक केली’

नागपूर जिल्ह्यात सुमारे ८८ हजारावर फ्रन्ट लाईन वर्कर कोरोनाच्या या आणीबाणीच्या लढाईत लढत आहेत. यात डॉक्टर, परिचारिका ज्याप्रमाणे आपल्याला वाचवण्यासाठी स्वत:चे जीव धोक्यात घालत होते, त्याच प्रमाणे रस्त्यावर खाकी वर्दीतील पोलिसांनीही दिवसरात्र सेवा दिली. या कोरोनाच्या युद्धात १७ पोलिसांना सेवा देताना कोरोनाची लागण झाली. यात या योद्धयांनी जीव गमावला आहे. याशिवाय शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. घरोघरी भेटी देत असताना नकळत कोरोनाने घेरले. यात जिल्ह्यातील ९ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेत कार्यरत अभियंता रामटेके यांचा मृत्यू कोरोनाच्या बाधेने झाला. विशेष असे की, या फ्रन्ट वर्करला खासगी रुग्णालयात एक खाट देखील मिळाली नाही, अशी उपेक्षा खासगी रुग्णालयांनी केली. अखेर मेडिकलमध्ये अखेरचा श्वास घेताना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मृत्यू झाला. महापालिकेतील सुमारे २३ फ्रन्टलाईन कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे. याशिवाय मेयो, मेडिकलसह आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रत्येकी दोन अशा सहा फ्रन्‍टलाईन वर्कर कोरोनाचे बळी ठरले आहेत. तसेच हिंगणा आणि कुही तालुक्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या सर्वांना कोविड योद्ध्यांसाठी विमा योजनेचे लाभ मिळावे यासाठी संबंधित कार्यालयांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. खाकी वर्दीतील ९ पोलिस राज्य शासनाकडून लाभ मिळाले असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - माजी सैनिकाच्या स्वप्नाची क्षणात राखरांगोळी; मुलांचे...

मृत्यूनंतरही ठरले उपेक्षित - 
कोरोना संकटाने लोकांना नात्यापासून दूर केले. त्यांना कोरोना योद्ध्यांना अखेरच्या क्षणी आपल्या माणसांशी भेटता आले नाही. त्यांच्या अंत्यसंस्कारालाही कुणाला जाता आलं नाही. केवळ चेहरा बघून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा अंत्यसंस्कार उरकून घेतला. या कोविड शहिदांना अखेरची सलामीही देता आली नाही.