
अमरावती ः महिलांच्या प्रसूतीकरिता शासकीय व खासगी रुग्णालयांची सोय असताना व साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या अमरावती महापालिका क्षेत्रात सरत्या वर्षातील अकरा महिन्यांत 85 बाळांचा घरीच जन्म झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्म प्रमाणपत्रासाठी पालक आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यावरून सुशिक्षितांच्या या शहरात सोयी असतानाही घरी प्रसूती केल्या जातात, हे अधोरेखित झाले आहे.
2020 च्या अकरा महिन्यांत महापालिका क्षेत्रात 11 हजार 600 बाळांचा जन्म झाला. त्यामध्ये 6,084 बालक तर 5,516 बालिकांचा समावेश आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून लॉकडाउन लागू झाला, तो 1 जुलैला अनलॉक झाला. लॉकडाउनच्या काळात आरोग्यसेवा अधिक तत्पर होती. मार्च ते जून अखेर अशा चार महिन्यांत 3,975 बालकांचा जन्म झाला. सर्वाधिक जन्मदर मे महिन्यात 1400 इतका होता.
महिलांच्या प्रसूतीकरिता शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शासनाकडून गरोदर महिलांना ने-आण करण्याकरिता रुग्णवाहिकाही असून तातडीने सुविधा पुरवण्यात येतात. ग्रामीण व आदिवासी भागात दवाखान्यातील प्रसूतीची टक्केवारी वाढली आहे. मात्र सुशिक्षितांच्या या शहरात 11 महिन्यांत 85 बाळांचा जन्म घरीच झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शासकीय व खासगी रुग्णालयांत जन्म झालेल्या बाळांची नोंद महापालिकेत केली जाते. त्यामुळे त्यांच्या जन्माचा दाखला मिळणे सोयीचे आहे. 11 महिन्यांत जन्मलेल्या 85 बाळांची नोंद मात्र महापालिकेत त्यांच्या जन्मावेळी झालेली नाही. आता त्यांच्या पालकांनी जन्मतारखेच्या दाखल्यासाठी चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. त्यांना पुराव्यादाखल दवाखान्यांतील नोंद मिळत नसल्याने अडचणी जाऊ लागल्या आहेत.
मुलींचा जन्मदर कमीच
मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर पाच टक्क्यांनी कमी आहे. 11 महिन्यांत झालेल्या एकूण 11 हजार 600 नवजातांच्या जन्मापैकी मुलींचा जन्मदर 47 टक्के, तर मुलांचा 52 टक्के आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.