esakal | ते गुंडांच राज्य, यापेक्षा वेगळी अपेक्षा तरी काय केली जाऊ शकते?; कोण म्हणाल असं, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

After the incident in Uttar Pradesh, Dr. Nitin Raut angry

उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था अजिबातच अस्तित्वात नाही. गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, देशात दलितांवरील अत्याचार आणि महिलांवरील उत्पीडनाच्या घटना सर्वाधिक उत्तरप्रदेशात होतात. अशा राज्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा तरी काय केली जाऊ शकते? त्यामुळे असे सरकार बरखास्त करावे, अशी आमची राष्ट्रपतींना विनंती आहे, असे डॉ. राऊत म्हणाले.

ते गुंडांच राज्य, यापेक्षा वेगळी अपेक्षा तरी काय केली जाऊ शकते?; कोण म्हणाल असं, वाचा

sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर : उत्तरप्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील बासगाव येथे सत्यमेव जयते या युवा सरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत उत्तरप्रदेशला गेले असता त्यांना सिमेवरच अडवण्यात आले. त्यावर मी उत्तरप्रदेशचा अतिथी होतो, तरीही त्या सरकारने अशा पद्धतीचा व्यवहार केला की मला आंदोलन करावे लागले, असे डॉ. नितीन राऊत म्हणाले.

सत्यमेव जयतेच्या कुटुंबीयाचे सांत्वन करण्यासाठी उत्तरप्रदेशला जाण्याचा माझा नियोजित कार्यक्रम होता आणि तो उत्तर प्रदेश सरकारला पाठवला देखील होता. त्यामुळे मी त्यांचा अतिथी होतो. तरीही तेथे मला अडवण्यात आले आणि बासगावला जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. त्यामुळे तेथेच मग आंदोलन केले. जवळपास दोन-अडीच तास हे आंदोलन चालले. त्यानंतर आम्ही पायीच बासगावकडे निघालो. आम्ही चालत असताना पोलिस आले आणि त्यांनी आझमगडच्या सर्किट हाऊसला नेले. तेथून थेट विमानतळावर सोडले. त्यामुळे आम्हाला परत यावे लागले, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी - दररोज तुमचे रूप दाखवणारा आरसाच तुम्हाला करू शकतो कंगाल.. कसा ते वाचा

उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था अजिबातच अस्तित्वात नाही. गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, देशात दलितांवरील अत्याचार आणि महिलांवरील उत्पीडनाच्या घटना सर्वाधिक उत्तरप्रदेशात होतात. अशा राज्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा तरी काय केली जाऊ शकते? त्यामुळे असे सरकार बरखास्त करावे, अशी आमची राष्ट्रपतींना विनंती आहे, असे डॉ. राऊत म्हणाले.

अतिथी देवो भव
‘अतिथी देवो भव' ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. काल उत्तरप्रदेश सरकारने जे केले त्यावरून त्यांची संस्कृती काय आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. सत्यमेव जयते या युवा सरपंचाचा खून करून सत्याला परास्त करण्याचे काम उत्तरप्रदेश सरकारने केले आहे. त्यामुळे या सरकारवर आता राष्ट्रपतींनी कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
- डॉ. नितीन राऊत,
ऊर्जामंत्री, महाराष्ट्र

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top