
Baidpura Violence
Sakal
अकोला : शहरातील बैदपुरा भागात गोमांस विक्री होत असल्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. याप्रकरणात दोन्ही गटाकडून तक्रारी प्राप्त झाल्या. सध्या याप्रकरणात अदखलपात्र गुन्हयाची नोंद झाली असून सिटी कोतवाली पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या घटनेत पोलिसांनी कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस निरिक्षक संजय गवई यांनी केले आहे.