Akola Crime: बारा दिवसापासून बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला! पिंजर-अकोला रोडवरील शेतातील विहिरात आढळला मृतदेह

Akola Crime: बारा दिवसापासून बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला! पिंजर-अकोला रोडवरील शेतातील विहिरात आढळला मृतदेह

बारा दिवसांपूर्वी पिंजर येथून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय शेख अफ्फानचा मृतदेह अखेर शनिवारी (ता. ३०) सायंकाळी एका शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला.

Barshi Takli Akola News: बारा दिवसांपूर्वी पिंजर येथून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय शेख अफ्फानचा मृतदेह अखेर शनिवारी (ता. ३०) सायंकाळी एका शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे पिंजरसह परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्रकार नेमका घातपात आहे की आणखी काय, याचा तपास पोलिस करत आहेत.


तालुक्यातील पिंजर येथे रहिवाशी शेख अय्यूब बागवान यांचा सात वर्षीय मुलगा शेख अफ्फान हा ता. १९ डिसेंबरपासून अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेतल्यानंतर तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी पिंजर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली होती. पोलिसांनी शुक्रवारी (ता. २९) श्वान पथकाला पाचारण केले.

श्वान पथकाने पिंजर पासून सुमारे दोन किमी अंतरावरील अकोला रोडवरील एका शेतातील विहिरीपर्यंत अफ्फानचा शोध घेतला. यावेळी पोलिसांनी विहिरीत डोकावून बघितले असता शे. अफ्फानचा मृतदेह सडक्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आला. मुलाच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली.(Latest Marathi News)

दरम्यान मृतदेह विहिरीचून बाहेर काढून पुढील उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतक अफ्फानच्या शवविच्छेदन अहवालानंतरच अनेक प्रश्नांची उत्तरे समोर येतील.

Akola Crime: बारा दिवसापासून बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला! पिंजर-अकोला रोडवरील शेतातील विहिरात आढळला मृतदेह
Waluj MIDC Fire : छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ कामगारांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?

दीड लाखांचे बक्षीस केले होते जाहीर
शेख अफ्फानचे वडील शे.खअय्यूब बागवान यांनी अफ्फानचा शोध लावणाऱ्याला किंवा खात्रीशीर माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. तसेच बार्शीटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते सैय्यद अबरार सैय्यद मीर यांनीही ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, असे एकूण एक लाख ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते. (Latest Marathi News)

संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी व पिंजर पोलिस मुलाचा शोध घेत होते. शेवटी मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली.

Akola Crime: बारा दिवसापासून बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला! पिंजर-अकोला रोडवरील शेतातील विहिरात आढळला मृतदेह
Waluj MIDC Fire : छ. संभाजीनगरात मध्यरात्री हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com