Akola JCB operator swept away in flood
Akola JCB operator swept away in floodsakal

अकोला : जेसीबीत झोपलेला युवक पुरात वाहून गेला

नाल्यातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामध्ये जेसीबी कोसळली

कुरणखेड : बोरगाव मंजू पोलिस स्टेशनअंतर्गत कुरणखेड येथे गुरुवारी रात्री राष्ट्रीय महार्गावरील पुलाच्या कामावर असलेला मजूर युवक पुरात वाहून गेला. हा युवक कुरणखेड परिसरातील एका मोठ्या नाल्याच्या परिसरात रात्री जेसीबीमध्ये झोपलेला होता. नाल्यातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामध्ये रात्री दीडच्या सुमारास अचानक जेसीबी कोसळली. यामध्ये हा युवक वाहून गेला की दबला, याबाबत शोध घेणे सुरू आहे.

अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. अकोला तालुक्यातील कुरणखेड काटेपूर्णा नदीच्या जवळ मोठा नाला आहे. येथे गुरुवारी दिवसभर दोन जेसीबीद्वारे काम सुरू होते. रात्री काम झाल्यानंतर कार्यरत तीन मजूर याच जेसीबींमध्ये झोपी गेले. एका जेसीबीमध्ये दोन मजूर होते. रात्री पावसाचा जोर वाढला. नाल्याचा पाण्याचा ओढा जेसीबीपर्यंत पोहोचला. जेसीबी हळूहळू पाण्यात जात असल्याची दिसल्याने एका मजुराने आपल्या जेसीबीत असलेल्या व्यक्तीला उठवून बाहेर काढले. त्यांनी दुसऱ्या जेसीबीत झोपलेल्या मजुरांना उठविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला कसेतरी बाहेर काढले. पण, दुसऱ्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच जेसीबी उलटली. यामुळे युवक पाण्यात वाहून गेला किंवा दबला असल्याचा संशय आहे.

हा युवक बिहार जिल्ह्यात येत असलेल्या गोपालगंज, तालुका कर्तारपूर येथील आहे. त्याचे नाव सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद (१८) आहे. शोधकार्य सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com