अमरावती : अमरावती ते अकोला महामार्गावर बेलोरा विमानतळाजवळ मालवाहू वाहन आणि कारच्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले..सोमवारी (ता. 6) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडल्याची माहिती बडनेऱ्याचे पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी दिली. मोहम्मद अनस मोहम्मद सईद (वय २०), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनिस (वय २२), अब्दुल अवेज मोहम्मद अकील (वय २६), मोहम्मद अनवेज अब्दुल सलीम (वय २२), अशी भीषण अपघातातील मृतांची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी दिली..या अपघातात त्याच कारमध्ये प्रवास करणारे मोहम्मद अनस मोहम्मद अनिस (वय २२), मोहम्मद अशर मोहम्मद हुजेफा (वय २३), हे दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींवर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताच्या भीषण दुर्घटनेनंतर सोमवारी मध्यरात्रीनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात व मंगळवार सात एप्रिल रोजी शवागारासमोर बडनेरा परिसरातील नागरिकांसह नातेवाइकांची प्रचंड गर्दी जमली होती..अपघातातील चारही मृत व जखमी, असे सर्व जुनी वस्ती बडनेरा येथील इस्लामी चौक अलमास गेट बडनेरा परिसरातील रहिवासी आहेत. सोमवारी मध्यरात्रीनंतर एमएच ०४ जेबी ३३६९ क्रमांकाच्या कारमध्ये सर्व युवक चहा पिण्याच्या उद्देशाने बेलोरा येथील एका चहा टपरीवर गेले होते. चहा पिल्यानंतर बडनेऱ्याकडे परतत असताना अमरावती ते अकोला महामार्गावरील जयस्वाल यांच्या शेताजवळ कारला एका मालवाहू ट्रकने मागून जोरदार धडक दिली..Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; डोकं चाकाखाली चिरडलं, चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर.त्यामुळे अनियंत्रित झालेली कार रस्त्यावरील खांबावर जाऊन धडकली. कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. तीन वेळा उलटल्याचे दिसून आले. समोरील टायरही धडकेनंतर बाजूला निघालेला दिसला. धडक देणारा ट्रकचालक घटनेनंतर प्रसार झाला होता. मंगळवारी (ता. सात) उत्तरीय तपासणीनंतर चौघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.