नवनीत राणांनी संजय राऊत, यशोमती ठाकूरांना हात जोडून केली ‘ही’ विनंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana

राणांनी संजय राऊत, यशोमती ठाकूरांना हात जोडून केली ‘ही’ विनंती

नागपूर : शुक्रवारी निघालेला मोर्चा आता वेगळ्याच दिशेने चालले आहे. या घटनेच्या सर्वांनी आपापल्या पद्धतीने निषेध केला आहे. सकाळपासून सुरू असलेले आंदोलन चिघळलेले आहे. सर्वांनी शांततेच्या मार्गाने निषेध करावा. सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करा आणि अमरावतीला शांत ठेवा. तसेच आतातरी राजकारण सोडा, असे म्हणत नवनीत राणा यांनी संजय राऊत आणि यशोमती ठाकूर यांना इशारा दिला.

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावतीमध्ये मुस्लीम संघटनांनी मोर्चा काढला होता. यावेळी दुकाने बंद करण्यावरून दगडफेक करण्यात आली होती. शनिवारी बंद घोषित केल्यानंतरही चांगलेच वादंग निर्माण झाले. एकूणच या प्रकरणाला हिंसक वळण आले आहे. एकमेकांना मारहाण, दगडफेक करण्यात आली. यामुळे वातावरण चांगलेच चिघळले आहे.

हेही वाचा: अमरावती बंद : नमुना गल्लीमध्ये निघाले शस्त्र; आता तणावपूर्ण शांतता

राजकमल चौकात पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवल्यानंतर जमाव मिळेल त्या वाटेने पळत गेला. पोलिसांनी अमरावतीत तगडा पोलिस बंदोबस्त लावल्याने तणावपूर्ण शांतता आहे. असे असले तरी सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करा आणि शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवा. ही आपली अमरावती आहे, अमरावती शांत ठेवा, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केले.

शांततेच्या मार्गाने निषेध करा

कालपासून अमरावतीमध्ये जे वातावरण निर्माण झाले आहे, त्याचा निषेध आम्ही आपापल्या पद्धतीने केले आहे. शनिवारी सकाळपासून सुरू असलेले वातावरण वेगळ्याच दिशेने चालले आहे. कोणताही पक्ष असो किंवा संघटना असो सर्वांना हात जोडून विनंती करते की शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवा. आम्ही काल निषेध करा आता शांततेच्या मार्गाने निषेध करा, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

हेही वाचा: अमरावतीत बंदला हिंसक वळण; यशोमती ठाकूर म्हणाल्या...

आतातरी राजकारण करू नका

शिवसेनेचे संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही राजकारण सोडले पाहिजे. ही आपली अमरावती आहे. अमरावतीला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करा, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केले.

loading image
go to top