esakal | ब्रेकिंग : अफगाणी नागरिकाला अटक; तालिबानी आतंकवाद्यांशी संबंध, १० वर्षांपासून नागपुरात वास्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : अफगाणी नागरिकाला अटक; तालिबानी आतंकवाद्यांशी संबंध

ब्रेकिंग : अफगाणी नागरिकाला अटक; तालिबानी आतंकवाद्यांशी संबंध

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : तालिबानी आतंकवाद्यांशी संबंध (Relations with Taliban militants) असलेल्या अफगाणी नागरिकाला नागपूर पोलिसांनी अटक (Citizen arrested) केली आहे. दहा वर्षांपासून त्याचे नागपुरात वास्तव्य (Lived in Nagpur for ten years) होते. तो तालिबानी संघटनांना सोशल मीडियावरून फॉलो (Follow up with Taliban organizations) करीत होता. नूर मोहम्मद अजीज मोहम्मद (३०) असे अटकेतील अफगाणी नागरिकाचे नाव आहे. तो दिघोरी परिसरात राहत होता. (An-Afghan-national-with-links-to-Taliban-militants-has-been-arrested)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांना नूर मोहम्मद याची माहिती मिळाली. त्यांनी बुधवारी पथकाला सक्रिय करून त्याला घरातून अटक केली. तो ब्लॅंकेट विकण्याचा व्यवसाय करीत होता. २००६ मध्ये नूर मोहम्मद हा सहा महिन्यांच्या व्हिसावर नागपुरात आला होता. त्यानंतर त्याने शरणार्थी बनण्यासाठी युनाटेड नेशन ह्यूमन राईट कौन्सिलकडे अर्ज सादर केला. परंतु, त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याने पुन्हा एकदा अर्ज केला. तोसुद्धा नामंजूर करण्यात आला. तरीही तो नागपुरात वास्तव्यास होता.

हेही वाचा: धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

गोळी लागल्याची खूण

पोलिसांनी नूरच्या घराची झडती घेतली. मात्र, कोणतेही शस्त्र आढळून आले नाही. परंतु, नूर याच्या शरीरावर गोळी लागल्याचा व्रण आहे. त्याच्या डाव्या खांद्यातून गोळी आरपार झाल्याची खूण आहे. त्याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. पोलिसांनी त्याचे सोशल मीडियावरील अकाऊंटची पाहणी केली असता तो तालिबानी संघटनांना फॉलो करीत असल्याचे दिसून आले. तो तालिबानी संघटनेशी जुळलेला आहे किंवा नाही याची चौकशी सुरू आहे. २००८ मध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि तालिबान्यांशी तणाव सुरू असतानाच नूर नागपुरात आला होता.

हेही वाचा: वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

बनावट नावाने वास्तव्य

सूत्रांच्या माहितीनुसार नूर मोहम्मद हा नाव बदलून नागपुरात वास्तव्य करीत होता. त्याचे खरे नाव अब्दूल हक असे आहे. त्याने तालिबानी संघटनेसाठी काम केलेले आहे. तर त्याचा एक भाऊ अजूनही तालिबानी संघटनेसोबत काम करीत आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये तो एक खंजीर घेऊन बांधवांना तालिबानी आणि मुजाहिदी संघटनेच्या समर्थनार्थ समोर येण्याची विनंती करीत आहे. त्याचा पासपोर्टही बनावट असल्याचीही चर्चा आहे.

(An-Afghan-national-with-links-to-Taliban-militants-has-been-arrested)

loading image