
नागपूर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात संस्थाचालकाविरोधात पोलिसांकडून कारवाई होत असताना, माजी गृहराज्यमंत्री यांनी काटोल तालुक्यातील दोन शिक्षिकांची नियुक्ती बोगस असल्याची तक्रार थेट पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना केली आहे. विशेष म्हणजे, तक्रार करण्यात आलेल्या दोन शिक्षिकांपैकी एका शिक्षिकेने चक्क निवडणूक लढविली असल्याची माहिती तक्रारीत नमूद करीत चौकशीची मागणी केली आहे.