esakal | समर्थक आक्रमक : ‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है’; ईडीच्या कारवाईचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है’; ईडीच्या कारवाईचा निषेध

‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है’; ईडीच्या कारवाईचा निषेध

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी रविवारी ईडीने पुन्हा एकदा छापा टाकला. नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. येथे ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरू केली. यामुळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते चांगलेच चिडले. समर्थकांनी नारेबाजी करीत ‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी केली. (Anil-Deshmukh-ED-action-Ed-in-Nagpur-nad86)

रविवारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत ईडीने देशमुख यांच्या घराची झाडाझडती घेतली. वडविहिरा येथे कारवाई केल्यानंतर त्याच्या शेतातील दिवाणजी पंकज देशमुखला सोबत घेऊन १०.३० वाजता ईडीचे अधिकारी काटोल येथील निवासस्थानी पोहोचले आणि कारवाई सुरू केली. सकाळी सात वाजतापासून ईडीची कारवाई सुरू होती.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

ईडी अनिल देशमुख यांच्या घरी कारवाई करीत असल्याचे समजताच काटोल व ग्रामीण भागाचे शेकडो महिला, पुरुष व कार्यकर्ते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोर एकत्र झाले. समर्थकांनी काळी फीत लावून अनिल देशमुख यांच्या समर्थनात ईडी व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पावसातही समर्थक ‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’, ईडीच्या कारवाईचा निषेध असो, परमवीरसिंह को गिरफ्तार करो, अशी घोषणाबाजी करीत होते.

अनिल देशमुख यांच्या घरासमोर समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. ईडीच्या तपासात समर्थक आड येऊ नये म्हणून काटोल उपविभागीय अधिकारी नागेश जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेवराव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. वडविहिरा येथून देशमुख यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांना काटोल येथे आणून विचारपूस केल्यानंतर सोडले. वडविहिरा येथील शेतीचे काम बघणारे पंकज देशमुख यांची पंचनाम्यावर स्वाक्षरी घेतल्यानंतर सोडले. दुपारी १ वाजेपर्यंत ईडीची कारवाई चालली. यानंतर ईडीचे अधिकारी नागपूरला रवाना झाले.

हेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

देशमुखांच्या मागे ईडीचा पिडा

अनिल देशमुख यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाही आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्या मागे ईडी हात धुऊन लागली आहे. ईडीने देशमुख यांची अंदाजे चार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर रविवारी नागपूर जिल्ह्यातील घरांवर कारवाई केली. यापूर्वी नागपुरातील घरावर ईडीने कारवाई केली होती. तसेच मुंबईतही कारवाई करण्यात आली आहे.

(Anil-Deshmukh-ED-action-Ed-in-Nagpur-nad86)

loading image