विवाहित शिक्षिकेवर प्रियकराचा बलात्कार; वारंवार लैंगिक शोषण

नोकरी लावून दिल्यामुळे दोघांचे घरी ये-जा वाढली
Atrocities
AtrocitiesAtrocities

नागपूर : एका शाळेत शिक्षिका पदावर नोकरी मिळवून देण्याचा मोबदला म्हणून विवाहित शिक्षिकेचे वारंवार लैंगिक शोषण (Atrocities on married women) करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रोशन अशोक खोडे (३८, रा. नर्मदा कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक (Arrested boyfriend) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय शिक्षिका आणि आरोपी रोशन खोडे हे बालपणातील मित्र असून, एकाच शाळेत शिकत होते. दरम्यान, तिचे लग्न झाले आणि तिला दोन मुले झाली. रोशन हा आरटीओ दलाल म्हणून काम करीत होता. दोन वर्षांपूर्वी वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी महिला आरटीओ कार्यालयात गेली. तेथे तिला रोशन दिसला. त्याने तिला ड्रायव्हिंग लायसेनन्स काढण्यासाठी मदत केली.

Atrocities
क्षणाची हौस बेतली जीवावर; २१ वर्षीय तरुणीचा तडफडून मृत्यू

रोशनने तिची विचारपूस केली असता आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याचे सांगितले. त्याने तिला आश्रम शाळेत नोकरीला लावून दिले. त्यामुळे तिचा संसार व्यवस्थित चालायला लागला. नोकरी लावून दिल्यामुळे दोघांचे घरी ये-जा वाढली. रोशनने तिला नोकरी लावून दिल्याचा मोबदला म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली.

मात्र, तिने मागणी फेटाळली. त्यानंतर त्याने नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने शारीरिक संबंधास (Atrocities on married women) होकार दिला. दोन-तीनदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही तो वारंवार शाळेतील नोकरी गमावण्याची धमकी देऊन बळजबरीने लॉजवर नेत होता. शेवटी तिने कंटाळून संबंधास नकार दिला.

Atrocities
ख्रिसमसनंतर दोन आठवड्यांचा लॉकडाऊन; ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ

पती-मुलाला मारण्याची धमकी

काही दिवसांनी रोशन खोडे हा पुन्हा शिक्षिकेच्या घरी आला आणि संबंधाची मागणी करू लागला. नकार देताच पतीला व मुलाला मारण्याची धमकी द्यायला लागला. बळजबरीने तिच्याशी संबंध प्रस्थापित करायला लागला. दोन दिवसांपूर्वी त्याने नकार दिला म्हणून बेदम मारहाण केली. त्यामुळे तिचा संयम सुटला आणि त्याच्या विरोधात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून रोशन यास अटक (Arrested boyfriend) केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com