
बछड्याला पेंच व्याघ्रप्रकल्पातील तिरताल मांगली येथील ‘एन्क्लोजर’मध्ये ठेवण्यात आले होते. अडीच वर्षीय वाघीण सध्या पेंच व्याघ्रप्रकल्पात वास्तव्यास आहे. या वाघिणीला जंगलात सोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्या, तरी वाघिणीला जंगलात सोडण्याचे अधिकार राज्याकडे नसून राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण यांच्याकडे आहे.
अवनीचा एन्काउंटर आठवतो का? तिच्या बछड्यांबाबत वनविभागाने घेतला हा निर्णय, मात्र...
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य परिसरात १३ लोकांचा जीव घेतल्यामुळे टी १ (अवनी) या वाघिणीला दोन वर्षांपूर्वी ठार केल्याने तत्कालीन सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. राज्य सरकारच्या आदेशामुळेच खासगी शिकाऱ्याला पाचारण करण्यात आल्याने हा मुद्दा अधिकच गाजला होता. तिच्या बछड्यांचे संगोपन व्हावे, या उद्देशाने वनविभागाने दीड वर्षे वयाच्या मादी बछड्याला जेरबंद केले होते. आता या बछड्यासोबत काय होणार वाचा...
बछड्याला पेंच व्याघ्रप्रकल्पातील तिरताल मांगली येथील ‘एन्क्लोजर’मध्ये ठेवण्यात आले होते. अडीच वर्षीय वाघीण सध्या पेंच व्याघ्रप्रकल्पात वास्तव्यास आहे. या वाघिणीला जंगलात सोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्या, तरी वाघिणीला जंगलात सोडण्याचे अधिकार राज्याकडे नसून राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण यांच्याकडे आहे.
अधिक माहितीसाठी - शेतातील मजूर करीत होता लाख विनवणी अन् अचानक निर्दयी दरोडेखोरांनी...
ही वाघीण आता सुदृढ असून जंगलात सोडल्यानंतर शिकार करू शकते, अशी खात्री वनविभागाला आहे. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या परवानगीनंतरच तिला तिच्या अधिवासात मुक्त केले जाऊ शकते. यासंदर्भात संपूर्ण अहवाल तयार केला असून येत्या आठवड्यात राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाला पाठविण्यात येणार आहे. त्यांची हिरवी झेंडी मिळाल्यानंतरच वाघिणीला जंगलात सोडायचे की नाही, असा निर्णय घेतला जाणार आहे.
वनविभागाकडून प्रस्ताव तयार
अडीच वर्षीय वाघिणीला जंगलात सोडण्यात येणार आहे. वनविभागाने तसा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे.
जाणून घ्या - नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर
अधिकार एनटीसीएकडे
वाघिणीला जंगलात सोडण्याचे अधिकार एनटीसीएकडे आहेत. वाघिणीबद्दलचा अहवाल तयार झाला असून तो एनटीसीएकडे लवकरच पाठविणार आहे. एनटीसीएने निर्णय दिल्यानंतरच ही प्रक्रिया होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागेल हे आताच सांगणे कठीण आहे. पावसाळ्यानंतरच या वाघिणीला जंगलात सोडणे सोईचे आहे. कारण, पावसाळा झाल्यानंतर वाघिणीवर देखरेख ठेवणे सोयीचे होईल.
- नितीन काकोडकर,
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
संपादन - नीलेश डाखोरे
Web Title: Avnis Calf Will Be Released Forest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..