esakal | शेतकऱ्यांनो, अझोलाचा करा वापर; दुहेरी फायद्यासह बहुगुणकारी
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनो, अझोलाचा करा वापर; दुहेरी फायद्यासह बहुगुणकारी

शेतकऱ्यांनो, अझोलाचा करा वापर; दुहेरी फायद्यासह बहुगुणकारी

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : अझोला (Azolla) ही पाणवनस्पती बहुगुणकारी आहे. शेतकऱ्यांनी घराशेजारी सावलीमध्ये या पाणवनस्पतीचे संगोपन करावे. ही वनस्पती हिरवळीचे खत म्हणून उपयोगात आणता येते. या पाणवनस्पतीच्या पेशीत नत्र स्थिर करणारी ॲनाबीना अझोली नावाची नील-हरित शेवाळ वर्गातील वनस्पती वाढत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदेशीर (Double benefit to farmers) ठरते. विशेषत: धानाच्या बांधीत अझोलाचा वापर केल्यास नत्रयुक्त रासायनिक खताचा १८ टक्क्यांपर्यंत वापर कमी (रासायनिक खतांचा वापर 18 टक्क्यांनी कमी झाला) होऊन बचत होते. त्यामुळे धानाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात अझोलाचा वापर करावा. (Azolla-can-save-up-to-18-percent-of-chemical-fertilizer)अझोला हे मुख्यत्वे धान पिकासाठी वापरतात. तसेच पशुखाद्य म्हणूनही त्याचा वापर

केला जातो. जिल्ह्यात यंदा वर्ष २०२१-२२ च्या खरीप हंगामात धानाची ९६ हजार हेक्टरपर्यंत लागवडीचे नियोजन आहे. विशेषत: नागपूर जिल्ह्यात कामठी, मौदा, पारशिवनी, कुही, रामटेक भिवापूर, उमरेड आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पीक घेण्यात येते.

हेही वाचा: प्रेयसीने केली आत्महत्या ; प्रियकरासह पाच जणांवर गुन्हा दाखल

हवेतील मुक्त नत्र स्थिर करून २० ते २५ किलो नत्र प्रती हेक्टरी मिळण्यासही बचत होते. यामुळे युरिया खताची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो. वनस्पतीमध्ये वाढवर्धक पदार्थ सोडल्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. प्रतिहेक्टरी उत्पादनातही वाढ होते. हरितद्रव्यमुक्त हिरवी पाणवनस्पती असल्याने हवेत प्राणवायू सोडते व हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते.

अझोलाचा वापर करण्यासाठी कृषी विभागामार्फत मोहीम स्वरूपात प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. अझोलाचा वापर प्रती हेक्टरी २० किलो धान रोवणीच्या १० दिवसांनी केल्यास २० ते २५ किलो नत्र उपलब्ध होते. दर चौरस मीटरला ३०० ग्रॅम अझोला धानाच्या बांधीत टाकल्यास दहा ते पंधरा दिवसात त्याची भरघोस वाढ होऊन प्रतिहेक्टरी पाच ते दहा टन अझोला तयार होऊन पिकास उपलब्ध होतो. यामुळे युरिया खताची गरज भासत नाही. त्यामुळे अझोला कल्चर हे शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरते.

हेही वाचा: भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात मात्र धक्के जाणवले नाहीत

दुधात फॅटचे प्रमाण वाढते

दुभत्या जनावरांना दररोज खाद्यान्नामध्ये दिल्यास दुधात फॅटचे प्रमाण वाढते. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अझोलानिर्मिती तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवरील कृषी विभागाची संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.

अझोलाचे मोफत वितरण

कन्हान येथील शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत अझोला तयार करून शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत वितरितही करण्यात आले आहे. याशिवाय कृषी महाविद्यालय नागपूरकडूनही शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात अझोलाचा कल्चर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून शेतकऱ्यांना अझोला कल्चर उपलब्ध व्हावे, यासाठी शासकीय फळ रोपवाटिका तसेच बीजगुणन केंद्र येथेही अझोलानिर्मिती करण्यात येत असल्याचे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितले.

(Azolla-can-save-up-to-18-percent-of-chemical-fertilizer)

loading image