

Severe Flood Situation in Bhamragad Due to Parlkota River Overflow
Sakal
गडचिरोली : छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला. शुक्रवारी (ता. २५) सकाळी ११.३० च्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. पुराचे पाणी थेट गावात आणि मार्केट चौकात शिरल्यामुळे अंदाजे २५० घरे जलमय झाली. प्रशासनाने शुक्रवारी दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवून ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. सध्या नद्यांचे पाणी ओसरू लागल्याने पूरपरिस्थितीत सुधारणा होत आहे.