High Court Given Orders Against Facebook: सोशल मीडिया व्यासपीठाच्या माध्यमातून नायलॉन मांजा विक्रेत्यांना मुभा देणाऱ्या फेसबुकच्या मेटा कंपनीविरोधात पर्यावरण संवर्धन कायद्यान्वये कारवाई सुरू करण्याचे मौखिक आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध प्राधिकरणांना दिले. आदेश देऊनही शुक्रवारी सुनावणीस अनुपस्थित असल्याने पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले.
यावर न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. फेसबुक वगळता इतर कंपन्यांनी प्रतिसाद देत नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबविल्याची माहिती पोलिस (सायबर क्राईम) प्रशासनाने न्यायालयाला दिली. यावर उत्तर देण्यासाठी फेसबुकतर्फे आज न्यायालयात वकील उपस्थित नव्हते. त्यामुळे, प्रकरणावरील सुनावणी काही वेळासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतरही वकील अनुपस्थित असल्याने न्यायालयाने कारवाई सुरू करण्याचे मौखिक आदेश दिले. (Latest Marathi News)
परिणामी, चौकशीनंतर फेसबुकच्या मेटा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. बंदी असूनही फेसबुकच्या ‘मार्केट प्लेस’ च्या माध्यमातून नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. तसेच, पोलिस प्रशासन, उच्च न्यायालयाच्या आदेशालाही फेसबुक उत्तर देत नाही. याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. पुढील सुनावणी बुधवारी (ता. १७) निश्चित केली. न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. देवेन चव्हाण यांनी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ॲड. एस. एस. सन्याल यांनी बाजू मांडली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.