esakal | जि.प.ने रचला इतिहास : जिल्ह्यात यंदा एकही बोअरवेल नाही
sakal

बोलून बातमी शोधा

जि.प.ने रचला इतिहास : जिल्ह्यात यंदा एकही बोअरवेल नाही

जि.प.ने रचला इतिहास : जिल्ह्यात यंदा एकही बोअरवेल नाही

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणासाठी मोठ्याप्रमाणात बोअरवेल तयार केल्या जातात. यावर कोट्यवधींचा खर्च होते. परंतु, मिशन फ्लशिंग राबवून जुन्याच बंद पडलेल्या बोअरवेल उपयोग आणण्यात आल्या. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. त्यामुळे यंदा एकही बोअरवेल करण्याची गरज पडली नाही. यंदाच्या वर्षी एकही बोअरवेल न करता जिल्हा परिषदेने इतिहासच घडविला. (Borewell-zilha-parishd-news-Mission-flushing-nad86)

आतापर्यंत जिल्ह्यात सात हजारांवर बोअरवेल खोदण्यात आल्यात. मतांच्या राजकारणासाठी लोकप्रतिनिधी बोअरवेलला प्राधान्य देतात. वस्त्यात जागा नसल्याने स्मशानभूमी परिसरात व्हायच्या. त्यामुळे पाणी प्रश्न सोडविण्याचा मूळ हेतू भरकटून जायचा. यावरून कमालीचे राजकारणही जिल्हा परिषदेत व्हायचे. यावर कोट्यवधींचा खर्च होत असे. आर्थिक फायद्यासाठी बोअरवेल करण्यात येत असल्याची टीका होत आली आहे.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

बोअरवेल घोटाळाही जिल्हा परिषदेत गाजला. मागीलवर्षीपासून जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाने फ्लशिंगची मोहीम हाती घेतली. त्याचे वार्षिक नियोजन, कामांची पद्धती, मनुष्यबळ, यंत्रसामग्रीची जुळवाजुळव आदींमुळे हा कार्यक्रम वेळेपूर्वी पूर्ण होऊ शकला. यामुळे गावातीलच बंद बोअरवेलला पुन्हा पाणी आले.

त्यामुळे पाण्यासाठी दूरवर जाण्याचा प्रश्न निकाली निघाला. यावर्षी २५७ नव्या बोअर निर्मितीचे लक्षांक होते. परंतु एकही नवीन बोअरवेल तयार करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाच्या तीन कोटी ८० लाख रुपयांची बचत झाली. त्यामुळे पाणीपुरवठा विभागासह यांत्रिकी विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

फ्लशिंगच्या माध्यमातून जुन्या बोअरवेल दुरुस्ती करण्यात आल्या. त्यामुळे नवीन बोअरवेल करण्याची गरज भासली नाही. पाण्यासाठी किंवा नवीन बोअरवेलसाठी यंदा ओरडही झाली नाही. अध्यक्ष, सीईओ व पदाधिकारी प्रशासनाच्या सहकार्याने हे करता आले.
- नीलेश मानकर, उपअभियंता, यांत्रिकी विभाग

(Borewell-zilha-parishd-news-Mission-flushing-nad86)

loading image