मुलगा चहा आणायला गेला अन् बापानं जीव संपवला, रुग्णालयातच आत्महत्या

death
deathe sakal

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल)शी (government medical college nagpur) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील (super specialty hospital nagpur) गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात उपचारासाठी दाखल असलेल्या कॅन्सरग्रस्ताने रविवारी तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या रुग्णाला तातडीने रुग्णवाहिकेतून मेडिकलमध्ये हलवले. मेडिकलमध्ये पोहचण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. ३७ दिवसांपुर्वी सुपरमध्ये इमारतीवरून पडून मृत्यूपावल्याची ही दुसरी घटना आहे. (cancer patient commit to suicide in super specialty hospital nagpur)

death
लॉकडाउनच्या काळातही शस्त्रक्रिया; एप्रिलपासून २८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया

दीपक सराफ (६२) असे मृत्यू पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याला स्वादुपिंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यात त्यांना कावीळ झाला. उपचारासाठी शनिवारी सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विविध वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. सोमवारी ईआरसीपी ही प्रक्रिया होणार होती. त्यात रुग्णाच्या स्वादुपिंडातील अंशाचे नमुने घेत तपासणीला पाठवले जाणार होते. दरम्यान रुग्ण दाखल असताना रविवारी सकाळी आठच्या सुमारास त्याचा मुलगा चहा आणण्यासाठी सुपरच्या बाहेर गेला. हीच संधी साधत दीपक सराफ वॉर्डाबाहेर आले. येथे थोडा वेळ थांबले. प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे येथील रँप असलेल्या भागातील गॅलरीत चढतांना दिसले. त्यानंतर अचानक ते खाली पडले. या रुग्णाने उडी मारली अशीच चर्चा येथे होती.

रुग्ण पडल्याने येथे जोराचा आवाज झाला. सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. रुग्ण तडफडत असल्याचे बघत तातडीने येथील डॉक्टरांसह इतरही वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिसांना उपस्थितांनी सूचना दिली. प्रथम रुग्णाला रुग्णवाहिका येईस्तोवर डॉक्टरांकडून स्थिर करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मेडिकलमध्ये हलवण्यात आले. परंतु मेडिकलमध्ये पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांना माहिती कळताच तेही घटनास्थळी पोहचले. मेडिकलचे अधिष्ठाता व गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता घटनास्थळी पोहचले होते. काही उपस्थितांचे म्हणणे डॉ. गुप्ता यांनी ऐकून घेतले. पोलिसांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामाही पोलिसांनी केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दुसरी घटना -

सुपर स्पेशालीटीत १५ मे २०२१ रोजी तुळशीराम पांडुरंग बागडे या ६८ वर्षीय किडनीशी संबंधित आजारला कंटाळून येथील इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला होता. ही आत्महत्या की, तोल जाऊन खाली पडला, याबाबत शंका होती. यानंतर ३७ दिवसांतर ही घटना घडली. वारंवार होत असलेल्या मृत्यूने सुपरमधील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com