CBI Team Reaches Nagpur in NEET Paper Leak Case
esakal
नागपूर : नीट-युजी परीक्षेतील पेपर फुटीमध्ये महाराष्ट्र एक प्रमुख केंद्र बनले आहे. नादेड, लातूर, नाशिक, पुणे, नागपूर, चंद्रपूरपर्यंत पेपर फुटीचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातूनच नागपुरात दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता.१९) सकाळपासून गणेशपेठ, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराची झाडाझडती घेतली. याशिवाय या विद्यार्थ्यांसह पालकांचीही चौकशी केल्याची माहिती आहे. हे विद्यार्थी लातूर येथील मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.