नागपूर विभागाचा निकाल ९९.६२ टक्के; राज्यात सहाव्या स्थानावर

नागपूर विभागाचा निकाल ९९.६२ टक्के; राज्यात सहाव्या स्थानावर

नागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे मंगळवारी दुपारी चार वाजता बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. यामध्ये नागपूर विभागाचा निकाल ९९.६२ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात ८ टक्क्यांची वाढ झालेली आहे. दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून पिछाडीवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याने यंदा विभागात ९९.८२ टक्क्यासह विभागात प्रथम स्थान पटकाविले आहे.

कोरोनामुळे यावर्षी बारावीपरीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकनासाठी ३०-३०-४० या सूत्र अवलंबिण्यात आले. यानुसार दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावी वर्गाच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित ४० टक्के गुणदान करण्यात आले. शिक्षकांनी २५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाइन पद्धतीने नोंदविले.

नागपूर विभागाचा निकाल ९९.६२ टक्के; राज्यात सहाव्या स्थानावर
चिंता नको; शिवशंकरभाऊ पाटील उपाख्य भाऊसाहेबांची प्रकृती स्थिर

मात्र, ग्रामीण भागात मागील वर्षभरापासून कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली नाहीत विशेष म्हणजे विज्ञान शाखांच्या वर्गामध्ये प्रॅक्टिकलही झाले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन कसे करावे असा प्रश्न शिक्षकांसमोर होतो. त्याला तोंड देत, प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधून, त्याच्याकडून स्वाध्याय घेत गुणदान करण्यात आले. त्याआधारावर मंगळवारी (ता. ३) निकालाची घोषणा करण्यात आली.

नागपूर विभागात १ लाख ४० हजार ८५९ विद्यार्थ्‍यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १ लाख ४० हजार ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये ७० हजार ३ मुले आणि ७० हजार ३२२ मुली उत्तीर्ण झाल्यात. त्यांची टक्केवारी अनुक्रमे ९९.५१ टक्के, ९९.७२ टक्के इतकी आहेत.

निकालात वाढ तरीही स्थान घसरले

गेल्यावर्षीही निकालात ९ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली होती. त्यानंतरही निकालाची टक्केवारी ९१.६५ इतकी होती. यावर्षी कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचा आधार घेत निकालाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे यंदाच्या निकालात ८ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे टक्केवारी ९९.६२ च्या घरात गेली. मात्र, विभाग गेल्यावर्षीच्या पाचव्या स्थानावरून खाली येत राज्यात सहाव्या स्थानावर आले.

नागपूर विभागाचा निकाल ९९.६२ टक्के; राज्यात सहाव्या स्थानावर
व्वा! मोदीजी व्वा! तुमच्या राज्यात खासदार पण चूल वापरतायंत

२०२१ - ९९.६२ टक्के

२०२० - ९१.६५ टक्के

शाखानिहाय उत्तीर्ण मुले

  • विज्ञान - ६५,२८१ - ९९.४३

  • कला - ४८,९०६ - ९९.८६

  • वाणिज्य - १९,६१५ - ९९.९५

  • एमसीव्हीसी - ६,५२३ - ९९.६१

नागपूर विभागाचा निकाल ९९.६२ टक्के; राज्यात सहाव्या स्थानावर
अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक

जिल्हानिहाय निकाल

  • चंद्रपूर - ९९.८२

  • गडचिरोली - ९९.७३

  • नागपूर - ९९.६१

  • वर्धा - ९९.५९

  • भंडारा - ९९.५४

  • गोंदिया - ९९.३७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com