Nagpur News : चहापत्ती महागल्याने ‘कटिंग’चे दर वाढणार

सर्वसामान्यांपासून कष्टकरी वर्गाचे आवडते पेय असलेला चहा आता दोन रुपयांनी महागला आहे.
tea rate hike
tea rate hikesakal
Updated on

नागपूर - सर्वसामान्यांपासून कष्टकरी वर्गाचे आवडते पेय असलेला चहा आता दोन रुपयांनी महागला आहे. शहरातील सर्वच कार्पोरेट चहाच्या विक्रेत्यांनी ही दरवाढ केलेली आहे. साखर, दूध, गॅस आणि चहा या सर्वच कच्चा मालाच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळेच ही भाववाढ केल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

उत्पादनात घट झाल्यामुळे चहा बाजारात दरावर सतत दबाव वाढत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार अजून किमती वाढण्याची शक्यता आहे. चहाटपरी मालकांनी कटिंग चहाचे दर हे एक ते दोन रुपयांनी वाढवण्याचा विचार सुरू केला आहे.

सन २०२४ मध्ये भारताच्या चहा उत्पादनात ७.८% घट झाली. ज्यामुळे एकूण उत्पादन १,२८४.७८ दशलक्ष किलोग्रॅमवर आले. ही घट मुख्यतः आसाम राज्यातील उत्पादनात कमी झाल्यामुळे झाली. जिथे उत्पादन ६८८.३३ दशलक्ष किलोग्रॅमवरून ६४९.८४ दशलक्ष किलोग्रॅमवर आले.

उत्पादन घटण्याचे कारण म्हणजे अत्याधिक उष्णतेच्या लाटा आणि पूर असल्याचे सांगण्यात येते. या उत्पादनातील तुटीमुळे २०२४ मध्ये चहाच्या सरासरी किमती १९८.७६ रुपये प्रती किलोपर्यंत वाढल्या. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ १८ टक्के आहे.

हंगामातील दुष्काळ, कीटकांचा प्रादुर्भाव, आणि रासायनिक अनुपालनाच्या कठोर नियमांमुळे उत्पादनात घट झाली आहे. एफएसएसएआयने कीटकनाशकांच्या वापरावर कठोर कारवाई केल्यामुळे, विशेषतः कमी दर्जाच्या चहाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. देशातील चहाची गुणवत्ता उत्तम आहे. मात्र, सकारात्मकरित्या मार्केटिंग होत नसल्याने चहाची विदेशात निर्यात होत नसल्याचे मतही अहिरकर यांनी व्यक्त केले.

पर्यावरणीय घटक आणि जागतिक तापमानवाढीमुळे चहाच्या उत्पादनासह गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. यामुळे किमतीवर दबाव आल्याने भाववाढ झालेली आहे. किरकोळ बाजारात चहाची किंमत किलोमागे ६० ते ७० रुपयांनी वाढली आहे. विशेषतः कमी दर्जाच्या चहाच्या प्रकारांमध्ये ही वाढ अधिक आहे

- अनिल अहिरकर, माजी अध्यक्ष, नाग विदर्भ टी मर्चंट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com