esakal | मानसिकतेत बदल! कोरोनानंतर कुठलीही चाचणी करायची नाही
sakal

बोलून बातमी शोधा

मानसिकतेत बदल! कोरोनानंतर नागरिकांना नकोय कुठलीही चाचणी

मानसिकतेत बदल! कोरोनानंतर नागरिकांना नकोय कुठलीही चाचणी

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) नागरिकांच्या मनात चांगलीच भीती (Fear in the minds of citizens) निर्माण झाली आहे. कोरोना चाचणी केली की अहवाल पॉझिटिव्हच येतो असा समज नागरिकांनी करून घेतला आहे. यामुळे सर्दी, खोकला, ताप आला तरी अनेकजण कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करतात. यामुळेच डेंग्यू, मलेरिया सारख्या आजाराकडे दुर्लक्ष (Ignore dengue, malaria) होत आहे. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अशात रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, नागरिकांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. (Citizens-neglect-dengue-malaria-screening)

मलेरिया-फायलेरिया विभागाकडून शहरातील वस्त्यांमध्ये फिरून डेंग्यू-मलेरिया आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येते. वस्त्यांमध्ये फिरून नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येते. विभागाकडून दीड वर्षांमध्ये डेंग्यूची तपासणी करण्यासाठी ६९८ नमुने घेण्यात आले. यापैकी ११९ नमुने सकारात्मक आढळून आले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२० पर्यंत ६४३ नमुने घेण्यात आले. यापैकी १०६ अहवाल सकारात्मक आलेत. जून महिन्यात डेंग्यूमुळे एकाचा मृत्यूही झाला.

हेही वाचा: वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

गतवर्षी दर महिन्याला ५३ नमुने घेण्यात आले. तिथेच १ जानेवारी ते ७ जून २०२१ पर्यंत केवळ ५५ नमुने घेण्यात आले. यापैकी १२ नमुने सकारात्मकही आढळून आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाच्या नमुन्यांचीही संख्या घटली आहे. विभागाने गेल्या वर्षी एक लाख ५६ हजार १६ नमुने घेतले होते. यापैकी केवळ ५ नमुने सकारात्मक आढळून आले आहे. जेव्हाकी १ जानेवारी ते ७ जून २०२१ पर्यंत ५८ हजार ७५३ नमुने घेण्यात आले. यापैकी एकही नमुना सकारात्मक आढळून आलेला नाही.

दीड वर्षात आढळले फक्त पाच रुग्ण

मलेरिया-फायलेरिया विभागाकडून दरवर्षी नमुने घेण्यात येतात. ज्या वस्त्यांमध्ये हे रुग्ण आढळतात त्या परिसरातील नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. परंतु, कोरोनामुळे दीड वर्षांपासून नागरिकांची मानसिकता बदलली आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगून डेंग्यू, मलेरियाची तपासणी करण्यास नागरिक टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दीड वर्षामध्ये जिल्ह्यात मलेरियाचे फक्त ५ तर डेंग्यूचे ११९ रुग्ण आढळून आले आहेच. तर डेंग्यूमुळे एकाचा मृत्यूही झाला आहे.

हेही वाचा: नोट फाटली तर काय करायचं? जाणून घ्या नियम

आम्हाला कुठलीही तपासणी करायची नाही

कोरोना विषाणूमुळे नागरिक दुसरी तपासणी करण्यास नकार देत आहेत. पथक तपासणीसाठी नागरिकांपर्यंत पोहोचतात तेव्हा बहुतांशी नागरिक नकारच देतात. ‘आम्ही कोरोना चाचणी केली आहे. अहवालही निगेटिव्ह आला आहे. आम्हाला आता कुठलीही तपासणी करायची नाही’ असे उत्तर नागरिकांकडून मिळत असल्याचे पथकातील सदस्य सांगतात.

(Citizens-neglect-dengue-malaria-screening)

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

loading image