Climate Change : ऊन-पावसाचा खेळ, हवामान बदलाचा पावडर, साबण विक्रीला फटका

उन्हाळ्यात पावसामुळे विविध उत्पादनांची विक्री घटली
climate changes affect on business of soap and powder ice cream oil ac nagpur
climate changes affect on business of soap and powder ice cream oil ac nagpursakal

नागपूर : अवकाळी पावसामुळे यावर्षी उन्हाचा तडाखा तुलनेने कमी होता. त्याचा फटका केवळ एसी आणि कूलरच नव्हे तर आइस्क्रीम, थंड तेल, टाल्कम पावडर, शीतपेये आणि साबणाच्या विक्रीतही घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. तापमान फार न वाढल्यामुळे लोकांनी या वस्तू विकत घेण्याची योजना लांबणीवर टाकली. परिणामी या हंगामात १५ ते २० टक्के विक्री घटली आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशात कडक उन्हाळा जाणवत आहे. अनेक ठिकणी पारा ४५ अंशाच्या वर गेला. त्यामुळे एसी, कुलर, फ्रिज या वस्तू विकणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय जोरात झाला. मात्र, यंदा मार्च, एप्रिल, मे महिन्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ऊन तापले नाही. कंपन्यांना यावर्षी १० टक्के व्यवसाय वाढीची अपेक्षा होती. मात्र, त्यांची निराशा झाली, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

climate changes affect on business of soap and powder ice cream oil ac nagpur
Child Care : लहान बाळाला AC/Cooler पुढे झोपवताना तुम्हीही करता का या 5 चुका, पडेल महागात

कुलिंग कंपन्यांची वाढली चिंता

अनेक कुलिंग उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांनी यावर्षी सुमारे ३० टक्के उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी उत्पादनांची विक्री घटली आहे. हा हंगाम महत्त्वाचा असतो. त्यामुळे मोठे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. या वस्तूंचीही भासली नाही गरज केवळ एसी आणि कुलरच नव्हे तर आइस्क्रीम, थंड तेल, टाल्कम पावडर, शीतपेये आणि साबणाच्या विक्रीतही घट झाली आहे. लोकांना या वस्तू वापरण्याची गरजच पडली नाही. ५०-६० टक्के व्यवसाय उन्हाळ्यात होतो.

climate changes affect on business of soap and powder ice cream oil ac nagpur
Monsoon Update : मॉन्सून उद्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता; कर्नाटकपर्यंत मजल; ‘बिपरजॉय’मुळे बळकटी

अशी होते दरवर्षी विक्री

  • आइस्क्रीम ५०-६० टक्के

  • कुलर ८ टक्के

  • शीतपेये ४५-५० टक्के

  • एसी ५०-६० टक्के

  • फ्रिज ४०-५० टक्के

  • पावडर/ तेल / साबण ५०-६० टक्के

climate changes affect on business of soap and powder ice cream oil ac nagpur
Weather Alerts : हवामानात बदल होताच मोबाईल देईल अलर्ट; करा फक्त 'ही' सेटिंग

यावर्षी बसला फटका

  • एसी ३५-४० टक्के

  • फ्रिज ३५-४० टक्के

  • शीतपेये ३५-३८ टक्के

  • आइस्क्रीम ५०-६० टक्के

  • कुलर ६-७ टक्के

  • पावडर, तेल, साबण - ८-१० टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com