esakal | नागपुरात २५ मुलांवर क्लिनिकल ट्रायल
sakal

बोलून बातमी शोधा

नागपुरात २५ मुलांवर क्लिनिकल ट्रायल

नागपुरात २५ मुलांवर क्लिनिकल ट्रायल

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : मुलांसाठी लसीकरण (Vaccination for children) व्हावे या हेतूने नागपुरात भारत बायोटेकतर्फे लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल (Clinical trials of the covacin vaccine) सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील लहान मुलांच्या ट्रायलमध्ये मुलांवर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. यामुळे बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील २५ मुलांना कोव्हॅकिसन लसीचा डोस (Dosage of covacison vaccine to 25 children) देण्यात आला. (Clinical-trial-on-25-children-in-Nagpur)

शहरातील मेडिट्रिना रुग्णालयात सुरू असलेल्या या क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या फेजमध्ये ६ ते १२ वयोगटातील २५ मुलांना लसीचा डोस देण्यात आला. मुलांवरील लसीकरण लवकरच सुरू व्हावे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना डोस देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार मंगळवारी ३५ मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यातून निवडलेल्या २५ मुलांना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला.

हेही वाचा: धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

भारत बायोटेकने यापूर्वीही केलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये नागपूरने सहभाग नोंदविला होता. आता मुलांवरील कोविड लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्येही नागपूरची निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील ४१ मुलांना पहिल्या डोसचे कोणतेही दुष्परिणाम मुलांवर दिसून आले नाही. लस दिलेल्या मुलांना कोणतीही रिॲक्शन न आल्यानं बुधवारी दुसऱ्या फेरीतील ६ ते १२ वयोगटातील मुलांना लस देण्यात आली.

तीन टप्प्यांत होणार ट्रायल

लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लशीचे मेडिट्रेना रुग्णालयात तीन टप्प्यांमध्ये ट्रायल घेतले जात आहे. पहिल्या टप्प्यात ४१ मुलांना लशीचा पहिला डोस दिला गेला. दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ आणि तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वयोगटातील मुलांवर ही क्लिनिकल ट्रायल होईल.

हेही वाचा: वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

मुलांवरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी ११० मुलांची नोंदणी झाली आहे. ३५ मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा त्यांना दुसरा डोस दिला जाईल. आज २५ मुलांना लस दिल्यानंतर त्यांना दिवसभर डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले होते.
- डॉ. वसंत खळतकर, बालरोगतज्ज्ञ

(Clinical-trial-on-25-children-in-Nagpur)

loading image