

Cockroach Janata Party Protest pune
esakal
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके १६ जूनला नागपुरात येणार असून देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि राष्ट्रीय परीक्षांमधील गैरप्रकारांच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टने आंदोलन केल्यानंतर पुणे येथेही आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता या आंदोलनाची धार वाढविण्यासाठी उपराजधानीत येणार आहेत. या आंदोलनाला अद्याप पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नसल्याने, नियोजित आंदोलनाच्या आयोजनावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे.