तुकाराम मुंढे आतापर्यंत गप्प का होते? असा प्रश्न विचारत गाठले पोलिस स्टेशन

Complaint lodged against Tukaram Mundhe
Complaint lodged against Tukaram Mundhe

नागपूर : माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिलांचे चरित्रहनन करण्यासाठी कपडे फाडण्याचा आरोप केला. परंतु, ज्यावेळी ही घटना घडली त्याचवेळी त्यांनी खुलासा का केला नाही. मुंढे यांनी केलेले आरोप खोटे असण्याची शक्यता आहे. शहरातील महिलांना बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी जम्मू आनंद यांनी सदर पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीत केली आहे.

महिलांनी एका आयएएस अधिकाऱ्यांना फसविण्याचा प्रकार केला, ही बाबही गंभीर आहे. अशा महिलांचा समूह इतरांनाही ब्लॅक मेल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणीही जम्मू आनंद यांनी केली आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी महिलांना त्यांच्याकडे पाठवून त्यांचे चरित्रहनन करण्याचा प्रकारही गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्यामुळे या प्रकरणात सामील महिला तसेच त्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आनंद यांनी केली आहे.

या घटनेबाबत मुंढे आतापर्यंत गप्प का होते? बदली झाल्यानंतरच त्यांनी याप्रकरणी खुलासा का केला? अशी शंका जम्मू आनंद व्यक्त केली आहे. मुंढे जाता जाता जाणीवपूर्वक शहरातील महिलांची बदनामी करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशीही मागणी आनंद यांनी केली आहे.

‘ऑल इज वेल़'

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, परंतु लक्षणे आढळून आली नसेल तरीही गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशाचे पालन करावे, इतरांना संक्रमण होणार नाही, याबाबत काळजी घ्या, असा सल्ला माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना दिला. मुंढे यांची मुंबईला बदली करण्यात आली असून सध्या ते गृहविलगीकरणात आहेत. नागपूरकरांना निरोपाचा सल्ला देतानाच त्यांनी ‘ऑल इज वेल़' असल्याचेही नमूद केले.

माजी आयुक्त मुंढेंचा निरोपाचा सल्ला

माजी आयुक्त तुकाराम मुंढे २४ ऑगस्टला कोविड पॉझिटिव्ह आढळून आले होते. परंतु, त्यांच्यात लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले असून कुटुंबीयांपासूनही एका खोलीत अलिप्त आहेत. याबाबत त्यांनीच फेसबुकवर पोस्ट टाकून माहिती दिली. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्याला खोलीत येऊ न देणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंगद्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत असल्याचे त्यांनी पोस्टवर नमूद केले. ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत, मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com