
Congress Agitation Nagpur : आंदोलनाला नागपुरात हिंसक वळण; कार पेटवली
नागपूर : काँग्रेसच्या (Congress) अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची ईडीकडून मंगळवारी (ता. २६) दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येत आहे. या विरोधात देशभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला नागपुरात हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीपीओ चौकात कार पेटवून टाकली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोनिया गांधी या मंगळवारी दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. यादरम्यान राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी (Sonia Gandhi) ईडीसमोर हजर होण्याची ही दुसरी वेळ आहे.
हेही वाचा: राज्यसभेतील १९ खासदार आठवडाभरासाठी निलंबित; दोन दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई
केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना त्रास देण्यासाठी ईडीची (ED) कारवाई केली जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. ईडीचा व केंद्र सरकारच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात आले.
याअंतर्गत नागपुरातही काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कार्यकर्त्यांकडून जीपीओ चौकात आंदोलन करण्यात येत होते. यावेळी आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर एका कारला आग लावली. आगीत कार पूर्णपणे जळाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात येत होता.
Web Title: Congress Agitation Violent Nagpur Fire Car
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..