काँग्रेसला हवा एक किंवा दोनचाच प्रभाग; नितीन राऊत म्हणतात...

congress
congresssakal

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेसच्या नेत्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. हा निर्णय मान्य नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कळवण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा प्रभागाचा घोळ निर्माण झाला आहे.

बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच काँग्रेस यास विरोध दर्शवला होता. काँग्रेसने एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याची मागणी होती. यावर बैठकीत शेवटपर्यंत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बहाल करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी बैठकीतून बाहेर पडताना तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचे सूतोवाच केले. त्यामुळे सर्व माध्यमांनी अंतिम निर्णय झाल्याचे समजून वृत्त प्रकाशित केले.

congress
पतीने वाचविला दोघींचा जीव अन् पत्नी गेली वाहून, मग...

मात्र, अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. काँग्रेस एक किंवा दोन यापेक्षा जास्त सदस्य प्रभागात नको या भूमिकेवर ठाम आहे. पुढील बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला कडाडून विरोधही केला जाणार आहे. त्यासाठी सर्व कायदेशीर व अभ्यासपूर्ण तयारीनिशी बैठकीला काँग्रेसचे मंत्री उपस्थित राहणार असल्याचे कळते.

राष्ट्रवादीचाही विरोध

गुरुवारी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत फेरविचार करण्यात येणार असल्याचे सांगून राष्ट्रवादीचाही या निर्णयाला विरोध असल्याचे सूचित केले. त्यामुळे शिवसेना वगळता तीनच्या प्रभागाला कोणाचाच होकार नसल्याचे स्पष्ट होते.

शिवसेनेच्या सोयीसाठी?

मुंबई महापालिकेचा स्वतंत्र कायदा असल्याचे सांगून बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीतून मुंबई महापालिकेला वगळण्यात आहे. तिथे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीच लागू राहणार आहे. मात्र, शिवसेनेला मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी इत्यादी महापालिकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे तीनच्या प्रभागाचा निर्णय घेण्यात आले असल्याचे समजते.

congress
रात्रीच्या अंधारात बोकड चोरला, कापला अन् मालकालाच विकला

नितीन राऊत म्हणतात...

या संदर्भात नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काँग्रेसचा सुरुवातीपासूनच बहुसदस्यीय प्रभागाला विरोधात असल्याचे सांगितले. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे शहराची वाट लागली आहे. कुठलाही नगरसेवक विकासकामाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. एकमेकांकडे बोट दाखवण्यात साडेचार वर्षे नगरसेवकांनी काढली. भ्रष्टाचारही वाढल्याचे दिसून येते. केवळ राजकीय सोयीसाठी असे निर्णय घेऊन जनतेला वेठीस धरणे अयोग्य आहे. आम्ही याचा विरोध करणार आहे. काँग्रेस एक किंवा दोनच्या प्रभागासाठीच आग्रही राहणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com