Mumbai-Nagpur Highway Accident I मुंबई-नागपूर हायवेवर कोपरगावजवळ भीषण अपघात; सहाजण जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-नागपूर हायवेवर कोपरगावजवळ भीषण अपघात; 6 जागीच ठार

मुंबई-नागपूर हायवेवर कोपरगावजवळ भीषण अपघात; 6 जागीच ठार

पोहेगाव - मुंबई-नागपूर महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात पगारे वस्तीनजीक आज अपघाताची घटना घडली आहे. या रस्त्यावर कंटेनरने ॲपे रिक्षाला चिरडले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात सहा जण ठार, सात जण जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी, दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात पगारे वस्तीनजिक हा अपघात झाला आहे.

घडलेली घटना अशी, आज सकाळी आठच्या सुमरासा झगडे फाट्याच्या दिशेने कंटेनरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला कट मारुन प्रवाशी वाहतुक करणाऱ्या अॅपे रिक्षाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात रिक्षातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षातील चार प्रवाशांसह मोटारसायकलवरील तीनजण असे सातजण जखमी झाले आहेत. या घटनेते जखमी झालेल्यांवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कोपरगाव परिसरात शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक होत आहे.

हेही वाचा: नवाब मलिकांची कोठडी 20 मेपर्यंत वाढली; कोर्टात आरोपपत्र दाखल

या भीषण अपघातात राजाबाई खरात (वय ६०, रा. चांदेकसारे), आत्माराम नाकोडे (वय ६५, रा. वावी), पुजा गायकवाड (वय २०, रा हिंगणवेडे), प्रगती होन (वय २०, रा. चांदेकसारे), शैला खरात (वय ४२, रा. श्रीरामपुर), शिवाजी खरात (वय ५२, रा. श्रीरामपूर) या सहाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर उर्रविरत सातजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींवर एस. जे. एस रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर शविच्छेदनासाठी मृतांचे शव ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे पाठवण्यात आले आहे. हा अपघात झाला त्यावेळी रिक्षामध्ये एकुण दहाजण होते. त्यापैकी सहाजनांचा मृत्यु तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग (वय ४२) रा. दानामंडी लुधियाना पंजाब, हा नाशिकच्या दिशेने फरार झाला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला झगडे फाटा येथुन ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कोपरगाव पोलिस करत आहेत. मात्र या भिषण अपघाताने कोपरगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्हा हादरला आहे.

हेही वाचा: मोदींच्या मिमिक्रीने फेमस झालेल्या श्याम रंगीलाची 'आप'मध्ये एंट्री

Web Title: Container Rickshaw Accident Mumbai Nagpur Highway Near Kopargaon 6 People Dead 7 Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top