esakal | सांडपाण्यात आढळला कोरोना डेल्टा स्ट्रेन; १,२०० ते १,४०० नमुन्यांचा अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सांडपाण्यात आढळला कोरोना डेल्टा स्ट्रेन; ८० टक्के नमुन्यांत कोरोना

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (सीम्स) आणि युके नॉटिंगहॅम विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील दहा झोन आणि ग्रामीण भागातील सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये ८० टक्के कोरोनाचे विषाणू आढळून आल्याची माहिती पुढे आली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्यांत १,२०० ते १,४०० नमुने गोळा करण्यात आले. यातील ७५ ते ८० टक्के नमुन्यांत कोरोनाचे संक्रमण आढळले.

या प्रकल्पाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) मंजुरी दिली होती. त्यानुसार १,२०० ते १,४०० नमुने गोळा करण्यासाठी नागपूर महापालिका आणि जिल्हा परिषदा यांच्याकडून मदत मिळाली. सर्व नमुन्यांची तपासणी सीआयआयएमएसच्या मॉलेक्युरल प्रयोगशाळेत केली गेली. निरीक्षणात प्रथम नमुन्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात ७५ ते ८० टक्के नमुन्यांत कोरोनाचे संक्रमण आढळून आले, असे सीम्सच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. राजपाल कश्यप म्हणाले.

हेही वाचा: भावाने नाही म्हटल्यावरही बहीण बसली प्रियकराच्या दुचाकीवर; अन्

विशेष असे की, काही नमुन्यांमध्ये विषाणूचे रूप जाण्याचे प्रयत्न झाले. त्यात बऱ्याच नमुन्यांमध्ये डेल्टा रूपही मिळाले आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक क्षती पोहोचवणारा डेल्टाचे संक्रमण नागपुरात होऊन गेल्याचे पुढे येत आहे. अभ्यासात विषाणूचा प्रभाव (व्हॉल्यूम) कमी की अधिक याचीही तपासणी केली गेली. त्यात जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान विषाणूचा प्रभाव जास्त असल्याचे आढळले, असेही डॉ. राजपाल कश्यप म्हणाले.

शहरातील लसीकरण न झालेल्या ४०० तर लसीकरण झालेल्या ६०० जणांच्या रक्ताच्या नमुन्यांचीही तपासणी झाली. त्यात लसीकरण न झालेल्या ६९ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात लक्षण्याचे प्रतिपिंड आढळले. म्हणजे अनेकांना न कळत कोरोना होऊन ते बरेही झाले आहे. तर लसीकरण झालेल्यांतील ९८ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंड आढळले. याप्रसंगी डॉ. अमित नायक, डॉ. अली अब्बास उपस्थित होते.

हेही वाचा: सुंदर तरुणी दिवसा करतात स्टाफच काम, रात्री करतात देहव्यापार

रोटा विषाणू देखील आढळला

सांडपाण्यातील नमुन्यांमध्ये तपासणीदरम्यान रोटा विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आढळले आहे. तर इतरही आजारांचा या नमुन्यांतून अभ्यास केला जात आहे. हा सर्व अभ्यास एका शोध प्रबंधात मांडला जाणार आहे. त्यानंतर अधिकृत सूक्ष्म पद्धतीने ही माहिती पुढे आणली जाणार असल्याचे डॉ. कश्यप म्हणाले. विशेष असे की, सांडपाण्यातून गोळा केलेल्या नमुन्यांत मोठ्या प्रमाणात प्रतिजैविकांचेही (अ‍ॅन्टिबॉडी) प्रमाण आढळून आले आहे. स्टेरॉईडसह इतरही औषधांचे अंश आढळले आहेत. त्यामुळे कोणत्या भागात किती प्रमाणात प्रतिजैविकांचा वापर जिल्ह्यात झाला, याची अंदाज घेता येतो. पाण्यात कोरोनाचे अंश सापडले आहेत, परंतु ते आरएनएचे विखुरलेले तुकडे आहेत. ते संसर्गजन्य नाहीत, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही.

सीआयआयएमएसकडून लसीकरण झालेल्यांमध्ये टप्या-टप्यात विशिष्ट कालावधीत लसीचा प्रभाव तपासण्यात आला. काही कालावधीनंतर लसींचा प्रभाव कमी होत असल्याचे निदर्शनात आले. परंतु संस्था स्तरावरील निरीक्षणात एकदा शरीरात प्रतिपिंड तयार झाल्यावर कालांतराने त्याचा प्रभाव कमी असला तरी पुन्हा विषाणूचे संक्रमण झाल्यास शरीरात लवकरच प्रतिपिंड तयार होण्याचा अंदाज पुढे आला आहे. त्यामुळे तिसरा डोज घेण्याची गरज नाही. परंतु आयसीएमआरच्या अभ्यासानंतरच त्यावर ठोस संशोधन होऊन तिसऱ्या डोसबाबत मत स्पष्ट होऊ शकेल.
- डॉ. राजपाल कश्यप, सीम्स हॉस्पिटल, नागपूर
जिल्ह्यात साथीच्या आजारांवरील संशोधनात सीम्स नेहमीच अग्रेसर आहे.आम्ही युरोपची गोष्ट करतो, मात्र भारतातील संशोधनाची गोष्ट करीत नाही. शहरातील क्लिनिकल आणि रिसर्च वैद्यक तज्ज्ञांच्या समन्वयातून लोकोपयोगी संशोधन करता येते. इच्छाशक्तीची गरज आहे, रुग्णहितासाठी सीम्स नेहमीच संशोधनात पुढे आहे.
- डॉ. लोकेंद्र सिंग, संचालक, सीम्स, नागपूर
loading image
go to top