नागपूरकरांनो काळजी घ्या! कोरोनाचा आकडा वाढतोय; दिवसभरात ४०३ जणांना बाधा, तर ८ मृत्यू

Corona patients are increasing again in nagpur new 403 patients today
Corona patients are increasing again in nagpur new 403 patients today

नागपूर ः गेले काही आठवडे कोरोना रुग्णांचा आकडा कमी कमी होत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, रविवारी पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकाच दिवशी ४०३ अहवाल पॉझिटिव्ह आले तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे.

रविवारी दिवसभरात केलेल्या ५ हजार ६५२ चाचण्यांपैकी ४०३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच उपचार घेत असलेल्या ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या लक्षणांमधून मुक्त होऊन रविवारी २७५ जण सुखरूप घरी परतले. कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींची संख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात ४०३ नवीन बाधित आढळल्यामुळे आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा १ लाख २४ हजार ९५३ झाला आहे. तर ८ मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ३ हजार ९५९ झाली आहे. मृतांमध्ये आज शहरातील ३, ग्रामीण भागातील २ आणि जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ लाख ४५ हजार ४७६ चाचण्या झाल्या आहेत. यांपैकी ५ लाख ८१ हजार १२५ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. तर ३ लाख ६४ हजार ४५१ रॅपिड अन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत. 

आज अडीच हजारावर चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये झाल्या आहेत. यातील १९० जणाना बाधा झाल्याचे पुढे आले. तर निरी प्रयोगशाळेमध्ये सलग तिसऱ्या दिवशी नमुने तपासण्यात आले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तर एम्समध्ये ३९६ चाचण्या झाल्या असून यातील १७ जण कोरोना बाधित आढळले. मेडिकलमध्ये ७२२ चाचण्या झाल्या. यातील ५३ जणांना बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाले. मेयोत९४० चाचण्या झाल्या असून ६९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले.५७७ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांतून २८ जण बाधित असल्याचे आढळून आले.

गृह विलगीकरणातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ

कोरोनाचा विळखा पडून दगावणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचप्रमाणे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्का खाली आला आहे. आज २७५ जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्ताचे प्रमाण ९३.६० वर आले आहे. तर सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा चार हजार ३७ वर पोहोचला आहे. यातील गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांचा आकडा अडीच हजाराच्या खाली आला होता, परंतु पुन्हा यात वाढ जाली असून आता २ हजार ७३४ वर पोहोचला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com